1 / 12आता एप्रिल महिना सुरू झाला आहे. नव्या आर्थिक वर्षात चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फंड तयार होऊ शकतो. म्युच्युअल फंडांपासून पीपीएफपर्यंत एप्रिलमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही यात गुंतवणूकीचा विचार करू शकता.2 / 12नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ एप्रिलपासून सुरू होत आहे, जे पगारदार आणि व्यापारी वर्गासाठी सर्वोत्तम मानलं जात आहे. आपल्या आर्थिक योजना मजबूत करण्यासाठी, आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ सुधारण्यासाठी आणि नवीन असेट क्लास जोडण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. अशा तऱ्हेनं आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. एप्रिलमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकता.3 / 12म्युच्युअल फंड हा आजच्या तरुणाईसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय बनला आहे. एकरकमी रक्कम गुंतवणे शक्य नसेल तर एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला थोड्या रकमेनं गुंतवणूक करता येते. प्रोफेशनल मॅनेजमेंट, टॅक्स बेनिफिट्स आणि दमदार परतावा यातून मिळू शकतो.4 / 12अशा परिस्थितीत आपण एप्रिलमध्ये अशा ठिकाणी गुंतवणूक सुरू केली पाहिजे जिथून आपल्याला भविष्यात पेन्शन मिळू शकेल. चांगली पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही अटल पेन्शन योजना किंवा एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकता.5 / 12दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डिजिटल सोनं सर्वोत्तम मानलं जातं. दरम्यान, आपण मोबाइल अॅप्सद्वारे केवळ १ रुपयात गुंतवणूक सुरू करू शकता, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे. सोन्याच्या १००% शुद्धतेची हमी असलेला हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे.6 / 12 पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही या एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करू शकता. चांगल्या परताव्यासह ही योजना सुरक्षित मानली जाते. किमान मासिक रक्कम १०० रुपये इतकी आहे, यात कमाल मर्यादा नाही. या योजनेतील परतावा तिमाही आधारावर ५.८ टक्के चक्रवाढ इतका आहे.7 / 12आपण या एप्रिलमध्ये गुंतवणुकीसाठी पीपीएफ योजना निवडू शकता. पीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के इतका आहे. पीपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता.8 / 12या योजनेतील गुंतवणुकीवरील सध्याचा व्याजदर सुमारे ७.५ टक्के आहे. यात तुमची रक्कम ११५ महिन्यांमध्ये दुप्पट होते त्यामुळे एप्रिलमध्ये गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.9 / 12बँकेपासून पोस्ट ऑफिसपर्यंत तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. बँकेला एफडीवर ६ ते ८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. सर्व बँकांचे एफडीचे व्याजदर वेगवेगळे असतात, तर पोस्ट ऑफिसचे व्याज ६ ते ७ टक्क्यांदरम्यान आहेत. त्यामुळे या एप्रिलमध्ये तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता.10 / 12शेअर बाजारात पैसे गुंतवणे देखील आपल्यासाठी चांगले ठरू शकते. भलेही बाजारात गुंतवणूक केल्याने कराची बचत होत नसली तरी पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारात तेजी असल्यास तुम्ही चांगली कमाई करू शकता.11 / 12सुकन्या समृद्धी योजनेवरील ठेवींवर ८.२ टक्के व्याज दिलं जात आहे. लघू बचत योजनांमध्ये मिळणारं हे सर्वाधिक व्याज आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू शकता. 12 / 12(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)