शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zomato Deepinder Goyal : असा डिलिव्हरी बॉय जो शून्य पगार असूनही दररोज कमावतो १ कोटी; माहितीये कोण आहे दीपिंदर गोयल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 9:05 AM

1 / 8
तुम्ही कधी ना कधी झोमॅटोचं नाव ऐकलंच असेल किंवा अनेकदा त्यावरून जेवण ऑर्डरही केलं असेल. झोमॅटोच्या मदतीनं अगदी काही वेळात तुम्ही एखाद्या हॉटेलमधून आपल्या घरी जेवण मागवू शकता.
2 / 8
यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीनं तुमचं आवडतं हॉटेलही ठरवू शकता. ज्या ठिकाणाहून तुम्ही ऑर्डर करता त्या ठिकाणाहून झोमॅटो ते पदार्थ तुमच्या घरापर्यंत पोहोचवतं. परंतु तुम्ही कधी ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या सॅलरीबद्दल विचार केलाय? तुम्ही त्यांच्या सॅलरीचा आकडा ऐकून अवाक् व्हाल.
3 / 8
झोमॅटोचे फाऊंडर आणि सीईओ दीपिंदर गोयल यांची रोजची कमाई १ कोटी रूपये आहे. दीपिंदर यांचा जन्मा पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. अभ्यासात सामान्य असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ते एक.
4 / 8
परंतु आठवीत असताना त्यांना मदत म्हणून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावेळी दीपिंदर यांनी वर्गात तिसरा क्रमांक पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हाच त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला.
5 / 8
यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक परीक्षांमध्ये दीपिंदर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. दरम्यान, नंतर आयआयटीच्या तयारीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना चंदीगडला पाठवलं. परंतु त्यावेळी ते यासाठी तयार नव्हते. नंतर त्यांनी आयआयटी दिल्लीत क्रॅक केली.
6 / 8
दीपिंदर यांनी आपल्या या प्रवासात नावासोबत मोठ्या प्रमाणात पैसाही कमावलाय. झोमॅटोच्या गेल्या वर्षीच्या नियमकाच्या फायलिंगनुसार त्यांनी त्या कालावधीत ३८७ कोटी रूपयांची कमाई केली.
7 / 8
झोमॅटो लिस्ट झाल्यानंतर गोयल यांची एकूण संपत्ती ६५० मिलियन डॉलर्स (५३४५ कोटी रुपये) वर पोहोचली. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ ४.७ टक्के हिस्सा होता.
8 / 8
कंपनीनं ESOP च्या रुपात ३५८ कोटी रुपये दिले होते. कंपनीचं मार्केट कॅप ६६,८७४ कोटी रुपये आहे. ते स्वत:ला इन्स्टाग्रामवर डिलिव्हरी बॉय असंच संबोधतात. कंपनीचा प्रचार करण्यासाठी अनेकदा ते ग्राहकांच्या घरी जेवण पोहोचवण्यासाठीही जातात.
टॅग्स :Zomatoझोमॅटोbusinessव्यवसाय