शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ वेळा बोनस देणाऱ्या सरकारी कंपनीनं गुंतवणूकदारांचं नशीब बदललं, १ लाखांचे झाले ४५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 2:11 PM

1 / 5
शेअर बाजारात धोका आहे, तसं त्यात अनेक संधीही मिळतात. कोणता शेअर कोणत्या वेळी कमाल करून जाईल सांगता येत नाही. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेट ही एक सरकारी कंपनी आहे. यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब बदललंय. कंपनीनं ३ बोनस शेअर दिल्यानंतर आता गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे ४५ कोटी रुपये झाले आहेत.
2 / 5
कंपनीचे शेअर्स सोमवारी ०.४० टक्क्यांच्या तेजीसह १००.३० रुपयांवर बंद झाला. १ जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये ४५,४९०.९१ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. या सरकारी कंपनीनं २:१, १:१० आणि २:१ असे तीन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.
3 / 5
१९९९ मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी यात १ लाख रुपये गुंतवले असतील त्यांना आतापर्यंत ४,५४,५४५ शेअर्स मिळाले असतील. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटनं पहिल्यांदा १४ सप्टेंबर २०१५ रोजी बोनस शेअर्स दिले होते.
4 / 5
यानंतर दोन वर्षांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी कंपनीनं पुन्हा १:१० बोनस शेअर्स दिले. त्यानंतर कंपनीनं पुन्हा एकदा २:१ असे बोनस शेअर्स दिले होते. जर कोणी १९९९ रोजी यात गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल तर त्याच्या शेअर्सची संख्या ४४,९९,९९४ झाली असेल.
5 / 5
जर सोमवारच्या हिशोबानं किंमत पाहिली तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांच्या १ लाख रुपयांचे ४५ कोटी रुपये झाले आहे. कंपनीचं मार्केट कॅप सध्या ७३,२८० कोटी रुपये आहे. (टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा.) 
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक