शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरीचा शोध, गोदामात काढली रात्र; आता उभी केली ३ हजार कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 8:13 AM

1 / 8
चित्रपट, मालिका किंवा व्हिडीओच्या मधोमध एखादी जाहिरात आली तर लोकांना खूप कंटाळा येतो. जाहिरात ही अशी गोष्ट आहे जी लोकांना पाहायला आवडत नाही. पण काही जाहिराती अशा आहेत की त्या पाहण्याचा तुम्हाला कधीही कंटाळा येत नाही. कोणत्याही ब्रँडच्या प्रचारात जाहिरातीही महत्त्वाची भूमिका बजावतात. जाहिरात आणि काम दोन्ही चांगलं असेल तर कंपनीला कोणीही रोखू शकत नाही असं म्हणतात.
2 / 8
आज आम्ही अशाच एका ब्रँडबद्दल सांगणार आहोत, ज्याची जाहिरात आणि काम या दोन्ही गोष्टींनी स्वतःला अशा प्रकारे जोडलंय की त्याचा वापर आज देशातील बहुतांश घरांमध्ये केला जातो. आज या कंपनीचा महसूल ३००० कोटी रुपये आहे.
3 / 8
आम्ही तुम्हाला फेविकॉलबद्दल सांगत आहोत. 'फेविकॉल का मजबूत जोड है, टुटेगा नहीं...' कंपनीने तिच्या लोकप्रिय टॅगलाइननुसार काम केलं. फेविकॉल हा असा ब्रँड आहे, जो जवळजवळ प्रत्येक घरात वापरला जातो. भारतात ग्लू बनवणाऱ्या या कंपनीचा इतिहास या जाहिरातींपेक्षा रोमांचक आणि प्रेरणादायी आहे.
4 / 8
बलवंत पारेख हे फेव्हिकॉल कंपनीचे संस्थापक आहेत. फेव्हिकॉलचं नाव ऐकलं नसेल असा क्वचितच कोणी असेल. बलवंत पारेख हे एकेकाळी प्यून म्हणून काम करायचे, पण त्यांनी आपल्या मेहनतीनं संपूर्ण खेळच बदलला.
5 / 8
आपल्या मेहतनीतच्या जोरावर त्यांनी असा व्यवसाय सुरू केला ज्यामुळे ते देशातच नाही तर जगात प्रसिद्ध झाले. सध्या, फेविकॉलची विक्री जगातील ५४ देशांमध्ये केली जाते आणि बहुतांश लोक याचा वापरही करतात.
6 / 8
यादरम्यान ते आपल्या पत्नीसोबत ऑफिसच्या गोडाऊनमध्ये राहत होते. येथे त्यांनी लाकडाचं काम अतिशय काळजीपूर्वक पाहिलं. बलवंत राय यांना स्वत:चा व्यवसाय करायचा होता, त्यामुळे त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या मदतीनं पाश्चात्य देशांतून सायकल, एरेका नट, पेपर डाय इत्यादी भारतात आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. बलवंत राय यांनी भारतात होचेस्टचं प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडको या जर्मन कंपनीसोबत ५० टक्क्यांची भागीदारी केली.
7 / 8
एका जर्मन कंपनीच्या एमडीच्या निमंत्रणावरून पारेख महिनाभरासाठी जर्मनीला गेले होते. कंपनीच्या एमडीच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत मुंबईत पारेख डायकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली. यानंतर फेडकोचे अधिक शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यांनी फेविकॉल नावाचा गोंद तयार केला.
8 / 8
फेविकॉल भारतात १९५९ मध्ये लाँच करण्यात आले. १९५९ मध्येच कंपनीचे नाव बदलून पिडीलाइट इंडस्ट्रीज असं करण्यात आलं. फेविकॉल लाकडाचं काम करणाऱ्या कामगारांसाठी वापरण्यास सुलभ गोंद म्हणून विकसित केले गेले. सध्या, फेविकॉलची विक्री जगातील ५४ देशांमध्ये केली जाते आणि बहुतांश लोक त्याचा वापरही करतात.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी