शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक रिपोर्ट आणि Adani ना बसला २,६१,४४,५३,८२,००० रुपयांचा फटका, टॉप २० मधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:50 AM

1 / 7
शुक्रवारी अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक अहवाल या मोठ्या घसरणीचं कारण ठरला. त्यानुसार अदानी समुहाच्या कंपन्यांची अमेरिकेच्या नियमाकामार्फत तपास सुरू आहे.
2 / 7
गुंतवणूकदारांसमोर समुहानं केलेलं सादरीकरण तपासलं जात आहे. हा अहवाल येताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. समुहाचे सर्व 10 शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरून बंद झाले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही घसरण दिसून आली.
3 / 7
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अदानींच्या संपत्तीत 3.19 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,61,44,53,82,000 रुपयांची घट झाली आहे. आता त्याची एकूण संपत्ती 58.2 बिलियन डॉलर्स झाली आहे.
4 / 7
या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 62.3 अब्ज डॉलर्सनं घसरली आहे. यासह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चार स्थानांनी घसरून 23व्या स्थानावर पोहोचले आहेत.
5 / 7
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं 24 जानेवारी रोजी अदानी समूहासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
6 / 7
या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, अलीकडच्या काळात परिस्थितीत पुन्हा सुधारली होती. पण पुन्हा एकदा आता एका अहवालामुळे अदानींना मोठा फटका बसला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
7 / 7
समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वाधिक 6.8 टक्क्यांनी घसरले आणि त्याचे मार्केट कॅप 18,559 कोटी रुपयांनी कमी झाले. त्याचप्रमाणे अदानी ट्रान्समिशन 6.4 टक्के, अदानी पॉवर 5.6 टक्के, अंबुजा सिमेंट्स 4.2 टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4.2 टक्क्यांनी घसरण झाली.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजार