शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उसने पैसे घेऊन खरेदी केलेला ट्रक; आज आहेत ५००० गाड्यांचे मालक, ट्रक किंग म्हणून आहे ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 8:37 AM

1 / 8
मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट सहज मिळवणं शक्य आहे. मेहनतीच्या जोरावर आयुष्यात काहीही अशक्य नाही. कठोर परिश्रमानं जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. एकेकाळी त्यांच्याकडे ट्रक घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यांनी पैसे उसने घेऊन व्यवसाय सुरू केला होता.
2 / 8
आज लोक त्यांना ट्रकिंग किंग म्हणून ओळखले जातात. आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत लॉजिस्टिक कंपनी व्हिआरएल लॉजिस्टिकचे (VRL Logistics) मालक विजय संकेश्वर यांच्याबद्दल. विजय संकेश्वर (Vijay Sankeshwar) यांना यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. तुम्ही व्हिआरएल लॉजिस्टिकचं नाव ऐकलंच असेल आणि त्यांचे ट्रकही रस्त्यांवर पाहिले असतील. ही भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक आहे.
3 / 8
विजय संकेश्वर यांच्या कुटुंबाचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता, पण त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. यासाठी ते आपल्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्धही गेले. त्यामुळे संकेश्वर यांनी आपल्या व्यवसायासाठी कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही.
4 / 8
त्यांनी आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उसने घेतले आणि एक ट्रक खरेदी केला. त्यांनी १९७६ मध्ये एका ट्रकच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला व्यवसाय चालवण्यास त्यांना खूप समस्या आल्या. परंतु नंतर त्यांना नशिबाचीही साथ मिळाली आणि १९९४ पर्यंत त्यांच्याकडे १५० ट्रक झाले.
5 / 8
लॉजिस्टिक व्यवसाय संघटित नसताना आणि दळणवळणाचा अभाव असूनही, ते १९९० मध्ये व्यावसायिक वाहतुकीतून प्रवासी सेवेकडे वळले. यानंतर विजय संकेश्वर यांनी विजयानंद ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली, तिचे नाव नंतर व्हीआरएल लॉजिस्टिक असं बदलण्यात आलं.
6 / 8
विजय संकेश्वर यांच्यावर कन्नड भाषेत एक चित्रपटही आला आहे. २०२२ मध्ये तो प्रदर्शित झाला होता. आज त्यांच्याकडे जितकी कमर्शिअल वाहनं आहेत तितकी कोणत्याही कंपनीकडे नाहीत, असा त्यांचा दावा आहे.
7 / 8
एका ट्रकपासून सुरू झालेला त्यांचा व्हिआरएल लॉजिस्टिकचा प्रवास ४,८१६ कमर्शिअल वाहनांवर पोहोचलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहनांच्या ताफ्यामुळे कंपनीचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलंय.
8 / 8
त्यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर विजय संकेश्वर यांची एकूण मालमत्ता ७० कोटी रुपये आहे. अवघ्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. पाच वर्षांत कंपनीनं आपल्या भागधारकांना ११५.०५ टक्के परतावा दिलाय. जर आपण त्याच्या कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोललो तर ते ६२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांची कंपनी सातत्यानं नफ्यात सुरू आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी