शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card : आधार कार्ड झालं पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित, चुकीचा वापर केल्यास त्वरित माहिती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:09 PM

1 / 5
तुमचे आधार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहे. आता जर कोणी तुमच्या आधारचा गैरवापर करत असेल तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) फिंगरप्रिंट-आधारित आधारची पडताळणी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केली आहे.
2 / 5
आता जर कोणी तुमच्या आधारचा गैरवापर करत असेल तर ते लगेच कळेल. नवीन प्रणालीद्वारे तुमचे आधार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनणार आहे. जेणेकरून कोणीही तुमच्या आधारचा वापर करून फसवणूक करू शकणार नाही. यामुळे बँकिंग, वित्तीय, दूरसंचार आणि सरकारी क्षेत्रांना मदत होईल.
3 / 5
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) UIDAI ने विकसित केले आहे. ते फिंगरप्रिंटद्वारे पडताळणी करते, अशी माहिती UIDAI कडून देण्यात आली.
4 / 5
हे पडताळणीसाठी बोटांवरील रेषांचा वापर करते. दुहेरी स्तर पडताळणी नेहमी मदत करते आणि गैरवापराची शक्यता कमी करते. फिंगरप्रिंट आधारित पडताळणीसह, कोणताही व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
5 / 5
आधार कार्ड हे देशातील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डाचा वापर बँकेत खाते सुरू करण्यापासून अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो. तसंच सब्सिडीसारख्या गोष्टींसाठीही आधारची गरज भारसते.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार