शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar कार्डवर पत्ता बदलणं आता झालं सोपं; कोणत्याही कागदपत्रांशिवाय होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:05 PM

1 / 14
आपल्या देशात जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळेच आधार कार्डासोबत असलेली संपूर्ण माहिती ही योग्यच असेल याची खात्री बाळगणं आवश्यक आहे.
2 / 14
आधारमधील माहिती चुकीची असेल तर आपल्याला काही समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. परंतु आता आधार कार्डासोबत असलेली माहिती बदलणं आता पूर्वीप्रमाणे कठिण राहिलेलं नाही.
3 / 14
जर तुम्ही नवं घर घेतलं असेल आणि तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर त्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार कार्ड तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं.
4 / 14
आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी आतापर्यंत कोणताही रहिवासी पुरावा असणं आवश्यक होतं.
5 / 14
परंतु आता आधार कार्ड व्हेरिफायरच्या मगतीनंदेखील आधार कार्ड अपडेट करू शकता.
6 / 14
यासाठी तुन्हाला केवळ परिवारातील कोणी अन्य सदस्य किंवा मित्र, अथवा घरमालक जे तुम्हाला पुराव्याच्या रूपात आपल्या आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची परवानगी देईल त्याच्या मदतीनं तुम्ही पत्ता बदलू शकता. तुम्हाला पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम व्हॅलिडेशन लेटरसाठी अप्लाय करावं लागेल. https://resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन Aadhaar Update Section मध्ये दिलेल्या Request Aadhaar Validation Letter ला सिलेक्ट करावं लागेल.
7 / 14
यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्ट (SSUP) ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला १२ अंकांच्या आधार क्रमांकाच्या नंबरसह लॉग इन करावं लागेल त्यानंतर व्हेरिफायरचा आधार क्रमांक टाकून सबमिट करावं लागेल.
8 / 14
व्हेरिफायरला मंजुरी देण्यासाठई त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एका एसएमद्वारे एक लिंक मिळेल. या लिंकव क्लिक केल्यानंतर त्यांना एर ओटीपी येईल तो त्या ठिकाणी नोंदवावा लागेल.
9 / 14
यानंतर व्हेरिफायरला ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करावं लागेल. त्यानंतर एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल.
10 / 14
याद्वारे तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून पत्ता तपासावा लागेल. तसंच पत्ता योग्य असल्यावर सबमिटवर क्लिक करावं लागेल.
11 / 14
सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक लेटर मिळेल. तसंच व्हेरिफायरकडे एक सीक्रेड कोडही पाठवला जाईल.
12 / 14
त्यानंतर पुन्हा एकदा आधारच्या वेबसाईटवर जाऊन Proceed to Update Address वर क्लिक करावं लागेल.
13 / 14
यानंतर आपल्या आधार क्रमांकाद्वारे लॉग इन करू शकता. तसंच Update Address via Secret Code हा पर्याय निवडावा लागेल.
14 / 14
सिक्रेट कोड सिलेक्ट केल्यानंतर पत्ता पुन्हा तपासून सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनवर आलेला अपडेट रिक्वेस्ट नंबर लिहून ठेवा. अशाप्रकारे तुमचा नवा पत्ता कोणत्याही कागदपत्रांशिवाय बदलता येईल.
टॅग्स :Indiaभारतonlineऑनलाइन