शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar card : पुढील दोन आठवड्यांत आधार कार्ड अपडेट करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 4:46 PM

1 / 7
आधार कार्ड सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. शिवाय तुमच्या आधार कार्डावरील तपशील अपडेटेड असणेही आवश्यक आहे. वेळोवेळी याबाबत ग्राहकांना सूचित करण्यात येत आहे. यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 आठवडे शिल्लक आहेत.
2 / 7
जर तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर पुढील 2 आठवड्यांत करा, अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आधार अपडेट करण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची गरज नाही. याशिवाय, वेळ सुद्धा वाचणार आहे.
3 / 7
आधार जारी करणारी संस्था 'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) लोकांना त्यांचे आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फोन नंबर किंवा पत्ता यामध्ये बदल करायचे असतील, तर तुमच्या आधारचे तपशील अपडेट करण्यासाठी आणखी फक्त 2 आठवडे आहेत.
4 / 7
दरम्यान, ज्यांचे 10 वर्षे जुने आधार कार्ड आहे, अशा लोकांचे आधार कार्ड UIDAI ने अपडेट करण्यास सांगितले आहे. आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 मार्च आहे. यानंतर आधार माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी 25 रुपये द्यावे लागतील.
5 / 7
तुमचे आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करावे लागेल. आधार नंबर आणि त्याच्याशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपीच्या मदतीने तुम्ही लॉग इन कराल. यानंतर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
6 / 7
यानंतर तुम्ही तुमची ओळख, पत्ता आणि इतर तपशील तपासू शकता. जर तुमच्या आधार खात्यात हे तपशील बरोबर असतील, तर तुम्हाला फक्त I verify that the above details are correct टिक करा आणि सबमिट करा.
7 / 7
तुमचे आधार तपशील बरोबर नसल्यास तुम्हाला संबंधित कागदपत्रे ड्रॉप डाउन मेनूमधून निवडून अपलोड करावी लागतील. यानंतर तुमचा आधार अपडेट होईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डbusinessव्यवसाय