शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधार बनवायचंय, पासपोर्ट की DL, अ‍ॅडमिशनपासून लग्नापर्यंत; आजपासून बर्थ सर्टिफिकेटनं होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 9:42 AM

1 / 8
आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट देशभरात सिंगल डॉक्युमेंट बनणार आहे. म्हणजे, जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर बहुतेक ठिकाणी इतर कागदपत्रांची गरज भासणार नाही. आत्तापर्यंत आधार कार्ड हा असा दस्तावेज मानला जात होता. परंतु राष्ट्रपतींकडून 'जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा २०२३' मंजूर झाल्यानंतर बर्थ सर्टिफिकेट हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. याद्वारे आधारसह अनेक कागदपत्रे तयार करता येतील.
2 / 8
बर्थ सर्टिफिकेट हे एक दस्तऐवज आहे ज्यामध्ये मुलांची जन्मतारीख, जन्म ठिकाण, लिंग आणि पालकांच्या नावांसह इतर महत्त्वाची माहिती नोंदवली जाते. यामुळे मुलांची ओळख निश्चित होते आणि पालकांची माहिती देखील मिळते. आधार असले तरी आता बर्थ सर्टिफिकेट आवश्यक असेल. पाहूया बर्थ सर्टिफिकेट कसं बनवता येईल.
3 / 8
मुलाच्या जन्माच्या २१ दिवसांच्या आत बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतो. परंतु कोणत्याही कारणास्तव पालकांनी त्या कालावधीत नोंदणी न केल्यास, नंतर ते डिले रजिस्ट्रेशन प्रोव्हिजन कायद्याच्या कलम १३ अंतर्गत नोंदणी करू शकतात. परंतु जर तुम्ही २१ दिवसांनंतर आणि ३० दिवसांच्या आत अर्ज केला तर तुम्हाला २ रुपये लेट फाईन भरावं लागतं.
4 / 8
जर अर्जदारानं जन्माच्या ३० दिवसांनंतर परंतु एका वर्षाच्या आत अर्ज केला तर, अर्जदाराला त्याला प्रतिज्ञापत्रासह लेखी परवानगी आणि ५ रुपये दंड भरावा लागेल. जर एखादा अर्जदार बर्थ सर्टिफिकेट बनवण्यासाठी एका वर्षाच्या आत अर्ज करू शकला नाही, तर त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे मॅजिस्ट्रेटकडे पडताळणीसाठी सादर करावी लागतील आणि १० रुपये लेट फाईन भरावा लागेल.
5 / 8
राज्य किंवा तुमच्या शहरानुसार तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता. बर्थ सर्टिफिकेट बनवण्यासाठी प्रत्येक राज्याची वेगळी प्रक्रिया आणि स्वतःची वेबसाइट असते. याठिकाणी तुम्ही बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता.
6 / 8
दरम्यान, सर्वांसाठी नियम जवळपास समान आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी महापालिका, नगरपालिकांशी समन्वय साधण्याची गरज आहे. शहरी भागात, आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी किंवा समकक्ष अधिकारी जन्म निबंधक म्हणून नियुक्त केले जातात. संदर्भ रुग्णालय, जिल्हा रुग्णालय किंवा इतर सरकारी रुग्णालयं किंवा समकक्ष यांच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याची जन्म निबंधक म्हणून नियुक्ती केली जाते.
7 / 8
बर्थ सर्टिफिकेट हे मुलाच्या ओळखीचं पहिलं दस्तऐवज आहे. ते बनवताच मुलांच्या जन्माची नोंद सरकारी खात्यात होते. हे ओळखीचे प्रमाणपत्र आणि व्यक्तीचे वय म्हणून वापरलं जातं. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीत नोंदणीसाठी हे आवश्यक आहे.
8 / 8
जन्म दाखला हा मुलाच्या जन्माचा मान्यताप्राप्त पुरावा आहे. हे सरकारला जन्म, मृत्यू आणि लोकसंख्या दरांची गणना करण्यास आणि नागरिकांच्या आरोग्य स्थितीचं मूल्यांकन करण्यास मदत करतं. तसंच, सामान्य लोकांशी संबंधित कोणतीही पॉलिसी त्यांना अधिसूचनेद्वारे पाठविली जाऊ शकते.
टॅग्स :GovernmentसरकारAdhar Cardआधार कार्ड