शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar शी निगडीत कामं थांबलीयेत? 'या' App चा वापर करून घरबसल्या घ्या ३५ सेवांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 2:17 PM

1 / 12
सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.
2 / 12
परंतु जर तुमच्या आधार कार्डावर एखादी चूक असेल तर तुम्हाला समस्य़ांचा सामना करावा लागू शकतो. जर त्यात कोणतीही चूक असेल तर ती आता लगेच दुरूस्त करणं सोपं झालं आहे.
3 / 12
जर तुम्हाला आधार कार्डाशी निगडीत कोणताही बदल करायचा असेल तर आता तुम्ही तो आपल्या स्मार्टफोनच्या आधारेही करू शकता. तुम्ही आपल्या आधार कार्डाच्या बाबतीतील तब्बल ३५ कामं अॅपद्वारे करून शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये mAadhaar App डाऊनलोड करावं लागेल.
4 / 12
यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील पाच सदस्यांचं आधार कार्ड ठेवू शकता. तसंत ते मॅनेज करणंही याद्वारे शक्य आहे.
5 / 12
जर तुमच्याकडे mAadhaar App चं जुनं व्हर्जन असेल तर तुम्हाला ते अनइन्स्टॉल करून नवं अॅप डाऊनलोड करावं लागेल. UIDAI नं या अॅपचं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. याद्वारे आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत.
6 / 12
mAadhaar App च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डाची कॉपी डाऊनलोड करून ठेवू शकता. तसंच यासोबत तुम्हाला आधार कार्ड रिप्रिन्टचाही ऑप्शन देण्यात येत आहे.
7 / 12
या अॅपच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये आधार कार्ड दाखवू शकता. जेव्हा तुम्हाला आयडी दाखवायचं असेल त्यावेळी तुम्ही या अॅपच्या माध्यमातून आयडी म्हणून आधार कार्ड दाखवू शकता.
8 / 12
mAadhaar App या अॅपद्वारे आधार कार्डधारक आपला युआयडी किंवा आधार कार्ड क्रमांक हवा तेव्हा लॉक अनलॉक करू शकतो. आधार सोबतच बायोमेट्रिक डेटा जोडलेला असतो आणि तो अतिशय संवेदनशील असतो.
9 / 12
या अॅपमध्ये तुम्ही बायोमॅट्रिक लॉकिंग सिस्टमही एकदा अनेबल करून शकता. त्यामुळे जोवर तुम्ही ते अनलॉक करणार नाही त्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
10 / 12
अॅपद्वारे तुम्हाला क्युआर कोड आणि ईकेव्हायसीचा डेटा शेअर करता येणार आहे. कोणत्याही सरकारी कामात पेपरलेस व्हेरिफिकेशनसाठी याची मदत घेता येऊ शकते. यामध्ये पासवर्डनं सुरक्षित केलेलाय ईकेव्हायसी आणि क्युआर कोड पाठवता येऊ शकतो.
11 / 12
तुमच्या नजीक कोणत्या ठिकाणी आधार कार्ड एनरॉलमेंट सेंटर आहे हेदेखील याद्वारे तुम्हाला पाहता येऊ शकतं.
12 / 12
कोणत्याही बनावट बेबसाईटवरून किंवा स्टोअरवरून बनावट अॅप डाऊनलोड करू नका. https://tinyurl.com/yx32kkeq (Android) आणि https://tinyurl.com/taj87tg (iOS) यावरून तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करता येईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डonlineऑनलाइनInternetइंटरनेट