aadhaar update know how to update new mobile number with aadhaar card
Aadhaar Update : मोबाईल क्रमांक बदललाय?; टेन्शन घेऊ नका, असा करा आधार कार्डासोबत अपडेट By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 5:23 PM1 / 6आधार कार्ड (Aadhaar Card) हे आता एक महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. अनेक सरकारी योजना असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न, प्रोविडेंट फंड अशा अनेक ठिकाणी आधार कार्डाची विचारणा केली जाते. यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या मोबाईलशी लिंक असणं अनिवार्य आहे.2 / 6जर तुम्ही आधार कार्डाशी निगडीत कोणतेही आर्थिक व्यवहार करत असाल तर व्हेरिफिरेशनसाठी तुम्हाला त्याच क्रमांकावर ओटीपी (OTP) पाठवण्यात येतो, जो तुमच्या आधार कार्डाशी लिंक असतो. यासाठीच UIDAI च्या वेबसाईटवर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं अनिवार्य आहे.3 / 6जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनसाठी OTP मिळणार नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल क्रमांक बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन मोबाईल नंबरला आधार क्रमांकाशी जोडणं अगदी सोपं आहे. परंतु यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जाणं अनिवार्य आहे.4 / 6मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी तुम्हाला एक Aadhaar करेक्शन फॉर्म देण्यात येईल. यामध्ये तुमची योग्य माहिती भरा. त्यानंतर तो फॉर्म त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याकडे जमा करा. यासाठी तुमच्याकडे २५ रूपयांचं शुल्क आकारलं जाईल.5 / 6फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक स्लीप दिली जाईल. या स्लीपमध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. या रिक्वेस्ट क्रमांकावरून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट झाला आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता. काही दिवसांमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत जोडला जाईल.6 / 6जेव्हा तुमचा मोबाईल क्रमांक जोडला जाईल तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल. त्या ओटीपीच्या मदतीनं तुम्ही आपलं आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही आधार कार्ड लिंक करण्याचं स्टेटस UIDAI च्या टोल फ्री १९४७ या क्रमांकावरही कॉल करून जाणून घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications