aadhar card how to order pvc aadhar card on uidai website know full process
क्रेडिट कार्डसारखे दिसणारे PVC Aadhaar Card करू शकता ऑर्डर, जाणून घ्या प्रोसेस... By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:50 PM1 / 7UIDAI ने गेल्या काही दिवसांपूर्वी PVC आधार कार्डची सुविधा सुरू केली आहे. आधार पीव्हीसी कार्ड हे क्रेडिट कार्डसारखेच आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसला तरीही, तुम्ही रजिस्टर्ड नसलेल्या मोबाइल नंबरवरून किंवा पर्यायी मोबाईल नंबरवरून तुमच्यासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. यासाठी जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप प्रोसेस...2 / 7आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in/genricPVC ला भेट द्या. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि नंतर कॅप्चा टाका. 3 / 7सर्व माहिती भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. जर मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही My mobile number is not register वर टॅप करा. त्यानंतर तुमच्याकडे असलेला कोणताही अल्टरनेट नंबर टाका. 4 / 7या मोबाईल नंबरवर OTP येईल आणि अशा प्रकारे तुम्ही एकाच नंबरवरून संपूर्ण कुटुंबाचे PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता. OTP एंटर करा आणि खाली दिलेल्या Terms and onditions च्या बॉक्सवर क्लिक करा.5 / 7यादरम्यान व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी Submit बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा आधार डिटेल्स दिसून येईल.6 / 7यानंतर Make payment वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेवर रिडायरेक्ट केले जाईल. यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. 7 / 7पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. तुम्ही PVC आधार कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. तुम्हाला एसएमएसद्वारे कार्ड डिलिव्हरीचे डिटेल्स देखील मिळेल. हे 5 कामकाजाच्या दिवसात मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications