शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI-PNB-HDFC-ICICI बँकांमध्ये खाते असणाऱ्यांना लागली लॉटरी, RBI च्या घोषणेनंतर मिळणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 12:40 PM

1 / 7
जर आपण पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एखादा चांगला पर्याय शोधत असाल, तर आज आम्ही आपल्याला अशाच काही पर्यायांसंदर्भात माहिती देत आहोत. जेथे पैसे गुंतवून आपण चांगला परतावा अथवा नफा मिळवू शकता.
2 / 7
आरबीआयनं रेपो रेट वाढवला - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे, यामुळे अनेक बँका आपल्या एफडीचे दरही वाढवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपण आपले पैसे फिक्स डिपॉझिटही करू शकता. याच बरोबर आपण पोस्ट ऑफिस एफडीमध्येही 2 वर्षांची गुंतवणूक करू शकता.
3 / 7
35 बेसिस पॉइंटची वाढ - आरबीआयने कालच रेपो रेट्सच्या दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यानंतर पुन्हा बँकांनी पुन्हा एकदा व्याज दरात वाढ करायला सुरुवात केली आहे. ईएमआय वाढी सोबतच आपल्याला बँक एफडीवरही अधिक व्याज मिळेल.
4 / 7
पोस्ट ऑफिस स्किम - पोस्ट ऑफिसच्या 2 वर्षांच्या एफडीवर सध्या 5.7 टक्के दराने व्याज मिळत आहे. तसेच, आपण 3 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, आपल्याला 5.8 टक्के दराने व्याज मिळेल.
5 / 7
एसबीआय - याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याजाचा फायदा देत आहे. आपण येथेही आपले पैसे फिक्स डिपॉझिट करून ठेऊ शकता.
6 / 7
HDFC, ICICI बँक - HDFC बँकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही बँक सामान्य ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच खासगी क्षेत्रातील ICICI Bank देखील सामान्य नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे.
7 / 7
पंजाब नॅशनल बँक - याशिवाय, पंजाब नॅशनल बँकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही बँक सामान्य ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे.
टॅग्स :bankबँकInvestmentगुंतवणूकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक