Adani enterprises shares was only 59 paise shares turned 1 lakh rupee into 37 crore rupee
फक्त 59 पैशांचा होता अदानीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 37 कोटी रुपये! By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 4:51 PM1 / 7अदानी ग्रुपच्या (Adani Group) एका कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहेत. अदानी ग्रुपच्या या कंपनीचे नाव अदानी एंटरप्रायझेस, असे आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत तब्बल 3,00,000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 7अदानी एंटरप्रायझेसचा शेअर या काळात 59 पैशांवरून तब्बल 2200 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 2500 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे. अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरची 52 आठवड्यांतील लो लेव्हल 1201.10 रुपये आहे.3 / 71 लाख रुपयांचे झाले 37 कोटी रुपयांहून अधिक - बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) अदानी एंटरप्रायझेसच्या शेअची किंमत 25 एप्रिल 2003 रोजी 0.59 रुपये एवढी होती. कंपनीचा शेअर 10 जून 2022 रोजी बीएसईवर 2202.05 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.4 / 7या काळात कंपनीच्या शेअर्सनी 300000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 25 एप्रिल 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक त्याने कायम ठेवली असती, तर आता त्याचे 37.28 कोटी रुपये झाली असते.5 / 7कंपनीच्या शेअरने 5 वर्षांत दिला 2800 टक्क्यांचा परतावा- बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 16 जून 2017 रोजी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 75.27 रुपयांवर होता. तो 10 जून 2022 रोजी बीएसईवर 2202.05 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती त्याने कायम ठेवली असती तर आज त्याचे 29.25 लाख रुपये झाले असते.6 / 7अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2420 रुपये एवढा आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात तब्बल 37 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications