शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani साठी संकटमोचक ठरला 'हा' भारतीय, काही मिनिटांत खरेदी केले १५,४४६ कोटींचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:26 PM

1 / 10
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. २४ जानेवारीला आलेल्या या अहवालानंतर महिनाभर अदानीच्या शेअर्समध्ये हाहाकार सुरूच होता. याचा अदानी समूहाचा मोठा फटका बसला. यानंतर त्यांनी रोड शोची घोषणा, कर्ज परतफेड अशी पावले उचलली, त्याचे परिणामही आता दिसत आहेत.
2 / 10
अदानी आता पुनरागमन करत आहेत. गेल्या एका आठवड्यापासून अदानींचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढलेही आहेत. दरम्यान, अडचणीत सापडलेल्या गौतम अदानींसाठी अमेरिकेतून आनंदाची बातमी आली आहे. या संकटाच्या वेळी एका भारतीयाने त्यांना साथ दिली आहे.
3 / 10
गुरुवार, २ मार्च रोजी, अमेरिका स्थित असेट्स मॅनेजर GQG Partners (GQG) ने 4 समूह कंपन्यांमधील १५४४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. अदानींच्या गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला असताना हा करार झाला आहे. अशा परिस्थितीत या कराराचा अर्थ खूप महत्त्वाचा ठरतो.
4 / 10
जर तुम्ही या कराराचा खोलवर विचार केला तर तुम्हाला समजेल की हा करार केवळ अदानीच नव्हे तर GQG साठीही किती फायदेशीर आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जीक्यूजीचे सीईओ राजीव जैन यांनी स्वतः सांगितलं की अदानी समूह सत्यम किंवा एनरॉन नाही. मला संधी मिळाली तर मला गुंतवणूक करायला नक्कीच आवडेल आणि संधी मिळताच ते मागे हटले नाही.
5 / 10
अदानींच्या कंपन्यांमध्ये ब्लॉक डील झाल्या आहेत. कंपनीने US-आधारित मालमत्ता व्यवस्थापक GQG सह १५,२२६ कोटी रुपयांचा सेकंडरी इक्विटी व्यवहार पूर्ण केला आहे. GQG ने ४ अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने ३,८७,०१,१६८ शेअर्सच्या बदल्यात ५,४६० कोटी रुपयांचा सौदा केला आहे.
6 / 10
अदानी पोर्ट आणि SEZ च्या ८,८६,००,००० शेअर्सच्या बदल्यात ५,२८२ कोटी रुपये घेतले आहेत. अदानी ट्रान्समिशनला २,८४,००,००० शेअर्ससाठी १,८९८ कोटी रुपये आणि अदानी ग्रीन एनर्जीला ५,५६,००,००० शेअर्ससाठी २,८०६ कोटी रुपयांच्या डीलमध्ये देण्यात आले आहे. अदानी या डीलमधून या गुंतवणुकीचा वापर कर्ज कमी करण्यासाठी आणि लिक्विडीटी वाढवण्यासाठी करणार आहे.
7 / 10
हा करार अदानींना कर्ज कमी करण्यास, रोख प्रवाह वाढविण्यास आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यास मदत करेल. अदानी समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी या करारावर सांगितलं की, आम्ही आमची पायाभूत सुविधा, पॉझिटिव्ह एनर्जी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास राखण्यात यशस्वी झालो आहोत. या डीलनंतर अदानीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.
8 / 10
त्याचबरोबर केवळ अदानीच नाही तर GQG कंपनीलाही त्याचा फायदा झाला आहे. GQG ने व्यवहार केलेल्या ४ कंपन्यांपैकी, प्रवर्तकांनी २ कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या वर्षाच्या उच्चांकी स्तरावरून ८३ ते ८४ टक्के सूट देऊन विकले आहेत. जर आपण डीलमधील शेअर्सच्या किमतीची २४ जानेवारीच्या किंमतीशी तुलना केली, तर हा करार ७६ टक्क्यांच्या मोठ्या सवलतीवर झाला आहे.
9 / 10
गेल्या तीन-चार दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. शेअर्सची रिकव्हरी सुरूच आहे. दरम्यान, या GQG कंपनीसोबत १५४४६ रुपयांची मेगा डील लाइफलाइन म्हणून काम करत आहे. GQG चे अध्यक्ष आणि CEO राजीव जैन हे या कठीण काळात अदानींसाठी संकटमोचक म्हणून धावून आले आहेत. हा करार गुंतवणुकीपेक्षा अधिक विश्वास जिंकण्यास मदत करेल.
10 / 10
राजीव जैन हे GQG भागीदार धोरणांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून काम करतात. विशेष म्हणजे राजीव जैन यांनी जून २०१६ मध्ये ही कंपनी सुरू केली होती. २०२३ मध्ये त्यांच्या कंपनीला मॉर्निंगस्टार फंड मॅनेजर ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. इक्विटी सौद्यांमध्ये ते अनुभवी म्हणून ओळखले जातात. त्याच्या शीर्ष भारतीय समभागांमध्ये ITC, HDFC, RIL, ICICI, SBI, Infosys, Tata सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक