शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 9:46 AM

1 / 10
गेल्या काही काळापासून Adani ग्रुप अनेकविध कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. शेअर मार्केटमधील विक्रमी घोडदौड असो वा एका वृत्तामुळे अब्जावधी रुपयांचे झालेले नुकसान असो. Adani ग्रुपबाबत विविध स्तरावर चर्चा होताना दिसत आहेत.
2 / 10
मुंबई उपनगरातील वीजवितरण व्यवसाय, मुंबई व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता Adani ग्रुपने महाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांवरही ताबा मिळवला आहे.
3 / 10
महाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या या २४ तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार असलेल्या ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’च्या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना Adani ग्रुपने विकत घेतला.
4 / 10
त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार Adani ला मिळाले आहेत. एका राज्याच्या सीमेतून दुसऱ्या राज्याच्या सीमेत प्रवेश करताना व्यापारी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना शुल्क द्यावे लागते.
5 / 10
महाराष्ट्राची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक, गोवा या सहा राज्यांशी जोडली आहे. त्यामुळे या सहा राज्यांच्या सीमेवर एकू ण २४ तपासणी नाके आहेत. हे तपासणी नाके उभारणे, ते चालवणे व शुल्क वसुलीचे काम ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर’ने आपल्या ‘महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.’या कं पनीमार्फत हाती घेतले होते.
6 / 10
त्यापैकी १८ तपासणी नाके कार्यरत असून ४ नाक्यांचे काम जवळपास सुरू झाले आहे. एक पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात असून एकाचे बांधकाम सुरू आहे. महाराष्ट्राच्या व्यापारी वाहतुकीवरील सेवा शुल्कांचे अधिकार असलेल्या या ‘महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.’ या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना ‘अदानी रोड ट्रान्सपोर्ट लि.’ या कंपनीने विकत घेतला आहे.
7 / 10
Adani ग्रुपने याबाबतची माहिती सोमवारी दिली. याबरोबर ४९ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा खरेदी करण्याची अदानीची तयारी असून त्यासाठी नियामक संस्थेची परवानगी लागेल, असेही सांगण्यात आले. Adani ग्रुपने मुंबई उपनगरात वीजवितरण व्यवसाय करणारी रिलायन्स कंपनी व त्यानंतर काही काळापूर्वी मुंबई व नवी मुंबई विमानतळ कंपनीवर ताबा मिळवला होता.
8 / 10
त्याच धर्तीवर ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर’च्या महाराष्ट्रातील तपासणी नाक्यांच्या कंपनीवर अदानीने आता ताबा मिळवला आहे. त्यामुळे २०३३ पर्यंतचा राज्याच्या सीमेवरील २४ तपासणी नाक्यांचा ताबा व तेथील सेवा शुल्क वसुलीचा अधिकार अदानी रोड ट्रान्सपोर्टला मिळणार आहे.
9 / 10
देशातील रस्ते व त्याच्याशी निगडीत पायाभूत सुविधांच्या विकासाचे व संचलनाचे काम हे देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचे आहेत. अदानी रोड ट्रान्सपोर्ट कं पनीसाठी ही नवी गुंतवणूक या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कं पनी होण्यासाठी मोठी संधी देणारी आहे, अदानी रोड ट्रान्सपोर्टकडून सांगण्यात आले आहे.
10 / 10
महाराष्ट्राच्या व शेजारच्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, तेलंगण या ६ राज्यांवरील सीमेवरून देशातील विविध राज्यांतील मालवाहतूकदारांना दक्षिणेत वा उत्तरेत जाता येते. महाराष्ट्राच्या सीमेवरून होणारी व्यापारी वाहतूक ही देशातील एकूण व्यापारी वाहतुकीच्या २० टक्के आहे. त्यामुळे या नव्या गुंतवणुकीतून अदानी समूहाला देशातील २० टक्के व्यापारी वाहतुकीवरील सेवा शुल्क वसुलीचे अधिकार मिळणार आहेत.
टॅग्स :AdaniअदानीMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय