adani group adani gas revised its cng prices effect on 60 thousand vehicle know new rates
आता Adani नेही वाढवल्या CNG च्या किमती; दरवाढीचा मोठा परिणाम होणार; जाणून घ्या, नवे दर By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 4:35 PM1 / 11गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे देशात डिझेलचे दरही शंभरी पार गेले आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. 2 / 11राजधानी दिल्ली (एनसीटी) तसेच एनसीआरच्या काही शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) या कंपनीने २ ऑक्टोबरलाच गॅस दरात वाढ केली. 3 / 11Adani ग्रुपमधील अदानी गॅसनेही सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अदानी गॅस लिमिटेडने दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबाद जिल्ह्यात सीएनजीच्या किमतीत १ रुपये ४४ पैसे प्रति किलोने वाढ केली आहे. 4 / 11आतापर्यंत फरिदाबादमध्ये ५६.५१ प्रति किलो दराने सीएनजी मिळत होता, पण आता तो ५७.९५ रुपये प्रति किलो झाला आहे. हा निर्णय सोमवार, ११ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे. दरवाढीचा थेट परिणाम ६० हजारांहून अधिक वाहनांवर होणार आहे. 5 / 11आताच्या घडीला फरीदाबाद जिल्ह्यात १९ सीएनजी स्टेशन आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सेक्टर-९, १७, २४, क्राउन प्लाझा, सेक्टर-२० ए, बी, एस्कॉर्ट्स कंपनीच्या समोर, यामाहा कारखान्यासमोर, सिक्रीजवळ आणि बायपास रोडचा समावेश आहे. या सीएनजी स्टेशनवर दररोज दोन लाख किलोहून अधिक सीएनजीचा पुरवठा केला जातो.6 / 11देशातील प्रमुख शहरांमधील गॅस वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्लीत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नैसर्गिक वायूच्या किंमती ६२ टक्क्यांनी वाढल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत.7 / 11सीएनजीच्या किमतीत झालेली वाढ ही २०१२ नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. अलीकडेच, आयजीएलने दिल्लीमध्ये सीएनजीच्या किंमतीत २.२८ रुपयांनी वाढ केली आहे, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडामध्ये ती २.५५ रुपयांनी वाढली आहे.8 / 11त्याचबरोबर पाईपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पीएनजीच्या किंमतीत २.१० रुपये प्रति घनमीटरने वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या महागाईचा भार ग्राहकांवर लादणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सलग सातव्या दिवशी कायम ठेवला. 9 / 11ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले आहे तर डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये झाले आहे. 10 / 11चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.०५ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.९६ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०८.०४ रुपये झाले आहे.11 / 11मुंबईत एक लीटर डिझेलचा दर १०१.०० रुपये झाला असून, दिल्लीत डिझेल ९३.१८ रुपये आहे. चेन्नईत ९७.५६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.२४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.२५ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.२५ रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications