शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani समुहाची मोठी झेप; १०० अब्ज डॉलर्सची मार्केट कॅप झालेली ठरली देशातील तिसरी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 2:02 PM

1 / 10
अदानी समुह भारतातील तिसरी अशी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे ज्याचं मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचलं आहे.
2 / 10
मंगळवारी अदानी समुहाच्या ६ पैकी ४ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारानुसार अदानी समुहाचं एकूण मार्केट कॅप १०४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झालं आहे.
3 / 10
सध्या अदानी समुहाच्या पुढे दोन दिग्गज कंपन्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे रिलायन्स समुह आणि दुसरी म्हणजे टाटा समूह.
4 / 10
मंगळवारी अदानी एन्टरप्राईजेसचा शेअर ५.६ टक्क्यांनी वधारून १२०२ रूपयांवर पोहोचला. तर अदानी गॅसच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांची वाढ होऊन तो विक्रमी १२४८ रूपयांवर गेला.
5 / 10
अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांची वाढ होऊन तो ११४७ रूपयांवर तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येही ४ टक्क्यांची वाढ होऊन तो आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचला.
6 / 10
याशिवाय अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ होऊन तो ९८.४० रूपयांवर तर ग्रीन एनर्जीमध्ये २.३ टक्क्यांची वाढ होऊन तो ११९४ रूपयांवर पोहोचला.
7 / 10
अदानी समुहाच्या आधी केवल मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचू शकली आहे.
8 / 10
सध्या टाटा समूहाचं सध्याचं मार्केट कॅप २४२ अब्ज डॉलर्स आणि रिलायन्सचं मार्केट कॅप १९० अब्ज डॉलर्सचं आहे. सध्या अदानी समुहही १०० अब्ज डॉलर्सच्या मार्केट कॅपवर पोहोचला आहे.
9 / 10
गेल्या एका वर्षभरात अदानी समुहाच्या सर्वच ६ लिस्टेड कंपन्यांनी गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स दिले होतं. अदानी समुहाच्या पाच कंप्यांचं मार्केट कॅप १ ट्रिलिअनपेक्षा अधिक आहे. तर अदानी पॉवर लिमिटेडची एकूण संपत्ती ३८ हजार कोटी रूपयांची आहे.
10 / 10
अदानी समुहाच्या पाच कंपन्या अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅस लिमिटेडचा कोणत्याही विश्लेषकाशी कोणतंही कव्हरेज नाही.
टॅग्स :AdaniअदानीTataटाटाRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीRatan Tataरतन टाटाshare marketशेअर बाजारMONEYपैसा