शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत गौतम अदानींचंही सहकार्य; ऑक्सिजनची कमतरता होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 10:51 AM

1 / 15
गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्यानं मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज देशात साडेतीन ते चार लाखांच्या जवळपास रुग्णांची नोंद होत आहे.
2 / 15
सध्या देशात ऑक्सिजनची आणि काही औषधांची कमतरताही असल्याचं दिसून येत आहे.
3 / 15
या पार्श्वभूमीवर अदानी समुहानंही पुढाकार घेत मदत सुरू केली आहे. अदानी समुहानं यासंदर्भातील माहितीही दिली आहे.
4 / 15
अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत अदानी समुहानंही आपल्या सर्व स्त्रोतांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 / 15
यामध्ये कर्मचारी आणि लॉजिस्टिक्सपासून बंदरे आणि विमानतळांचाही समावेश आहे.
6 / 15
वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजन आणि त्यांच्या वहनासाठी योद्य क्रायोजेनिक कंटेनर्सच्यासोबतच आरोग्य सेवेसाठी पायाभूत सुविधांसाठीही मदत केल्याची माहिती अदानी समुहानं दिली आहे.
7 / 15
७८० टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन नेण्यास सक्षण असलेल्या ४८ क्रायोजेनिक टॅक्सचीही खरेदी केल्याची माहिती अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी दिली.
8 / 15
'भारतात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली त्याच वेळी अदानी समुहानं आपल्या परदेशातील सपर्कांची मदत घेण्यास सुरूवात केली,' अशी माहिती अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी दिली.
9 / 15
या मदतीच्या सहाय्यानं वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजन आणि परिवहनासाठी क्रायोजेनिक कंटेनरसारख्या महत्त्वपूर्ण वस्तूंचा पुरवठा सुरू राहावा, असं अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
10 / 15
समुहानं सौदी अरेबिया, थायलँड, सिंगापुर, तैवान आणि संयुक्त अरब अमिरातीतील बड्या उत्पादकांकडून ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केल्याचंही त्यांनी नमूद केलं.
11 / 15
यापैकी काही मोठे क्रायोजेनिक टँक गुजरात स्थित मुंद्रा बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात आले.
12 / 15
तर अन्य भारतीय हवाई दलाच्या मदतीनं देशात आणण्यात आल्याचंही कंपनीनं सांगितलं.
13 / 15
गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ४,३,७३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
14 / 15
तर दुसरीकडे ३,८६,४४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर गेल्या चोवीस तासांत ४,०९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.
15 / 15
दरम्यान, देशात सध्या ३७,३६,६४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीतडे १६,४,३,६६३ लोकांचं आतापर्यंत अताापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAdaniअदानीairforceहवाईदलOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं