Adani Group' ला 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन; दिली प्रतिक्रिया.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 11:00 AM1 / 8अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी समुहावर घोटळ्याचे आरोप केले आहेत, त्यामुळे देशात शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर मोदी सरकारकडून अजुनही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2 / 8हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाला 90 अरब डॉलरचे नुकसान झाले आहे. याबाबत आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही सरकारमध्ये आहोत आणि कोणत्याही खासगी कंपनीशी संबंधित समस्यांवर प्रतिक्रिया देत नाही.' मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनीही यासंदर्भात वक्तव्य करण्यास नकार दिला होता.3 / 8दरम्यान, काल अदानी एंटरप्रायझेसने आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी कंपनीचा एफपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला. अमेरिकन शॉर्टसेलिंग कंपनी हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसने हे पाऊल उचलले आहे. BSC डेटानुसार, अदानी एंटरप्रायझेसच्या FPO अंतर्गत 4.55 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, तर 4.62 कोटी शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते.4 / 8गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या 96.16 लाख समभागांसाठी जवळपास तिप्पट निविदा प्राप्त झाल्या. पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या विभागातील 1.28 कोटी समभाग पूर्णतः सबस्क्राइब झाले. किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनी कर्मचार्यांकडून एफपीओला प्रतिसाद मिळालेला नाही. 5 / 8अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, 'गेल्या आठवड्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये उच्च अस्थिरता असतानाही मंगळवारी एफपीओ यशस्वीरित्या बंद झाला. कंपनी आणि तिच्या व्यवसायावरील तुमचा विश्वास आमचा आत्मविश्वास वाढवणार आहे, ज्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.6 / 8कंपनीच्या शेअरमध्ये अनपेक्षित चढ-उतार झाल्याचे उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितले. 'असाधारण परिस्थिती पाहता, कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की FPO पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही,', असंही त्यांनी सांगितले.7 / 8आमच्यासाठी गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरी आहे आणि त्यांना कोणत्याही संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी संचालक मंडळाने FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 8 / 8गेल्या आठवड्यात आलेल्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. घसरणीचा हा ट्रेंड बुधवारीही कायम राहिला. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये समूह कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ७ लाख कोटी रुपयांनी घसरले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications