शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani Airport Holdings च्या लीडरशिपमध्ये मोठे बदल; आता मुंबईत नाही, तर अहमदाबादमध्ये असेल मुख्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 9:27 AM

1 / 10
Adani Airport Holdings: मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज) आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मॅनेजमेंट हाती आल्यानंतर काही दिवसांतच Adani Airport Holdings Limited (AAHL) नं नेतृत्वात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 10
याअंतर्गत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आर. के. जैन यांच्याकडे देण्यात आली आहे.
3 / 10
याशिवाय Adani Airport Holdings Limited (AAHL) नं आपलं मुख्यालयही दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
4 / 10
अदानी समुह अतिशय वेगानं प्रगती करत आहे. यासोबतच हा निर्णय घेण्यात आला आहे की AAHL चं मुख्यालय आता मुंबई ऐवजी गुजरातमध्ये असेल, असं अदानी समुहानं एका प्रेस रिलिजद्वारे सांगितलं.
5 / 10
हा निर्णय आम्हाला सर्वांच्या सहयोगानं वेगानं निर्णय घेण्यासाठी मदत करेल, जे या कालावधीत सर्वात महत्त्वाचं आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.
6 / 10
AAHL नं मुंबई आंतरराष्ट्री एअररपोर्टचे दिग्गज आर.के. जैन यांच्याकडे CEO Airports ची जबाबदारी सोपवली आहे. जैन है पूर्वीपासूनच MIAL शी जोडले गेलेले आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रोजेक्ट मिळवण्यातही त्यांचं मोठं योगदान असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
7 / 10
आर.के.जैन यांच्यापूर्वी बेहना जंदी हे CEO एअरपोर्ट्स होते. आता त्यांच्याकडे AAHL मध्ये नॉन एअरो डिपार्टमेंटच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
8 / 10
याव्यतिरिक्त MIAL मध्ये आर के जैन यांच्या जागी प्रकाश तुल्सियानी यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सध्या AAHL मध्ये ऑपरेशनल प्रेसिडेंट आहेत.
9 / 10
१३ जुलै रोजी Adani Group ची सब्सिडायरी कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं GVK Group कडून MIAL च्या मॅनेजमेंटची जबाबदारी आपल्या हाती घेतली होती.
10 / 10
सध्या अदानी समुहाकडे देशातील एकूण सात विमानतळांचं मॅनेजमेंट हाती आलं आहे. MIAL ऐवजी कंपनीकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर आणि तिरुवनंतरपुरम या विमानतळांची जबाबदारी आहे.
टॅग्स :AdaniअदानीAirportविमानतळMumbaiमुंबईMangaluruमंगळुरू