शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani Group Shareholding: अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये कोणाचे किती शेअर्स? जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 5:46 PM

1 / 6
Adani Group Shareholding: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आल्यापासून(जानेवारी 2023 पासून) गौतम अदानी आणि अदानी समूह चर्चेत आहेत. सध्या अदानी समुहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स अर्ध्यावर आले आहेत, तरीदेखील अनेकजण अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये कोणाचे किती शेअर्स आहेत...
2 / 6
Ace Equity डेटाने यासंदर्भातील आकडेवारी दिली आहे. आकडेवारीनुसार, मार्च 2023 तिमाहीच्या अखेरीस प्रमोटर्सकडे सिमेंट कंपनी ACC मध्ये 56.69 टक्के हिस्सा होता. यामध्ये 8.19 टक्के शेअर्स म्युच्युअल फंडंकडे, 13.57 टक्के सामान्य लोकांकडे आणि 10.06 टक्के एफआयआयकडे आहेत. त्याचप्रमाणे, आणखी एका सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट्समध्ये, प्रमोटर्सकडे 63.21 टक्के, म्युच्युअल फंड 5.80 टक्के, सार्वजनिक 10.88 टक्के आणि FII 11.16 टक्के आहेत.
3 / 6
अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीबद्दल बोलायचे तर, तिची 69.23 टक्के होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे. याशिवाय म्युच्युअल फंडंचे 0.87 टक्के, लोकांचे 7.86 टक्के आणि एएफआयआयचे 17.75 टक्के शेअर्स आहेत. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये प्रमोडर्सचे 57.26 टक्के, म्युच्युअल फंडंचा 0.12 टक्के, लोकांचे 24.16 टक्के आणि एफआयआयची 17.13 टक्के हिस्सेदारी आहे.
4 / 6
अदानी पोर्ट्समध्ये प्रवर्तकांकडे 61.03 टक्के, म्युच्युअल फंड 3.09 टक्के, सार्वजनिक 7.95 टक्के आणि FII 17.99 टक्के आहेत. त्याचप्रमाणे, अदानी पॉवरमध्ये, प्रमोटर्सकडे 74.97 टक्के, म्युच्युअल फंडंकडे 0.01 टक्के, सार्वजनिक 13.32 टक्के आणि FII 11.70 टक्के आहेत.
5 / 6
अदानी टोटल गॅसमध्ये प्रमोटर्सकडे 74.80 टक्के, म्युच्युअल फंडंची 0.12 टक्के, सार्वजनिक गुंतवणूक 2.75 टक्के आणि एफआयआयची 16.31 टक्के हिस्सेदारी आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये प्रमोटर्सचे 71.65 टक्के, म्युच्युअल फंडांची 0.12 टक्के, पब्लिकची 3.51 टक्के आणि एफआयआयची 21.05 टक्के हिस्सेदारी आहे.
6 / 6
FMCG कंपनी अदानी विल्मारमध्ये प्रवर्तकांकडे 87.94 टक्के, म्युच्युअल फंड 0.02 टक्के, सार्वजनिक 10.68 टक्के आणि FII 1.27 टक्के आहेत. नुकत्याच समूहाचा भाग बनलेल्या NDTV या मीडिया कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 69.71 टक्के, सार्वजनिक 27.28 टक्के आणि FII 3 टक्के आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक