शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani Group Shares : एक बातमी अन् अदानींच्या शेअर्सवर तुटून पडले लोक! 4 ला लागले अपर सर्किट, गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 1:50 PM

1 / 10
बाजारातील व्यवहाराचा आठवडा सुरू होण्यापूर्वीच अदानी समूहाने केलेली घोषणा यशस्वी ठरली आहे. आपण शेअर तारण ठेऊन घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली असल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केले होते. खरे तर या कर्जाची परतफेड ठरलेल्या वेळेच्या आत करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, आज अदानी समूहाचे अधिकांश शेअर हिरव्या निशाणावर आहेत. तर काही शेअर्सना अपर सर्किट लगले आहे.
2 / 10
अदानी समूहाने रविवारी जाहीर केले होते की, त्यांनी शेअर्स तारण ठेऊन घेतलेले संपूर्ण 2.65 अब्ज डॉलर्सचे कर्जाचे प्री-पेमेंट केले आहे. याच बरोबर अंबुजा सिमेंटमधील अदानीच्या प्रमोटर्सची इक्विटी भागीदारी वाढली आहे. तर जाणून घेऊयात अदानी समूहाच्या काही खास शेअर्ससंदर्भात...
3 / 10
अदानी एंटरप्रायजेसनं घेतली उसळी - अदानी समूहातील मुख्य कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारातच 2.30 टक्क्यांनी अथवा 43.65 रुपयांनी वधारून 1940.10 रुपयांवर पोहोचला. हा शेअर आज वाढीसह 1902 रुपयांवर खुला झाला. आता BSE वर कंपनीचे मार्केट कॅप 2,21,553 कोटी रुपये झाले आहे.
4 / 10
अदानी पॉवरला अपर सर्किट - अदानी पॉवरचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात अपर सर्किटला दिसले. हा शेअर आज 214.75 रुपयांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात हा शेअर 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 215.50 रुपयांवर पोहोचला.
5 / 10
अदानी ट्रान्समिशनला अपर सर्किट - अदानी ट्रान्समिशनच्या शेअरलाही आज अपर सर्किट लागले आहे. हा शेअर 5 टक्के अथवा 45.15 रुपयांनी वाढून 949 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर आज अपर सर्किटसह खुला झाला.
6 / 10
अदानी ग्रीनला अपर सर्किट - अदानी ग्रीनच्या शेअरलाही आज अपर सर्किट लागले आहे. हा शेअर 5 टक्के अथवा 34.15 रुपयांच्या वाढीसह 717.20 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअरदेखील आज अपर सर्किटवरच खुला झाला.
7 / 10
अदानी टोटल गॅसलाही अपर सर्किट - अदानी टोटल गॅसच्या स्टॉकलाही आज अपर सर्किट लगले. हा शेअर 5 टक्के अथवा 47.50 रुपयांच्या उसळीसह 997.65 रुपयांवर पोहोचला. हा शेअरही आज अपर सर्किटवरच खुला झाला.
8 / 10
अदानी विल्मरमध्येही तेजी - सुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रात अदानी विल्मरचा शेअरही 0.33 टक्के अथवा 1.50 रुपयांनी वाढून 454.80 रुपयांवर ट्रेड करताना दिसला. हा शेअर आज 445.20 रुपयांवर खुला झाला. आणि व्यवहाराच्या सुरुवातीच्या सत्रात 473 रुपयांपर्यंत पोहोचला.
9 / 10
एसीसी सिमेंट - अदानी समूहाची सिमेंट कंपनी एसीसी सिमेंटचा शेअर सोमवारी किंचित वाढीसह 1850 रुपयांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात तो 1.84 टक्क्यांनी अथवा 33.90 रुपयांच्या घसरणीसह 1813.25 रुपयांवर व्यवहार करत होता.
10 / 10
अंबुजा सिमेंटचा शेअर - अंबुजा सिमेंटचा शेअर सोमवारी सकाळच्या सत्रात वाढीसह 382.55 रुपयांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यापारात, तो 0.41 टक्के किंवा 1.55 रुपयांनी घसरून 376.80 वर आला होता.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकAdaniअदानी