Adani Group Shares become Zero to Hero in Just 3 Years shares jumps high and reach on record level
Adani Group Shares: फक्त 3 वर्षांत अदानी ग्रूपचे शेअर्स 'झिरो टू हिरो'; कसे बनले रॉकेट? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:45 PM1 / 10अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडनबर्ग (Hindenburg Reserach) च्या रिपोर्टनंतर, अदानी ग्रुपच्या (Adani Group) शेअर्सनी गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. केवळ एकाच दिवसात कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, गेल्या केवळ 3 वर्षांत अदानी समूहाचे शेअर रेकॉर्ड लेव्हलवर कसे पोहोचले? या कालावधीत स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.2 / 10अदानी एंटरप्रायजेस - 18.31 टक्के - 1 एप्रिल 2019 रोजी कंपनीचा शेअर 146.90 रुपयांवर होता. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 4008.85 रुपयांवर होती. आज कंपनीचा शेअर 18.52 टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर स्टॉक 627.50 रुपयांनी घसरून 2761.45 वर आला आहे.3 / 10अदानी पॉवर लिमिटेड - 5 टक्के - 1 एप्रिल 2019 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 49.85 रुपयांवर होती. 15 ऑगस्ट 2022 रोजी या शेअरची किंमत 411.95 वर पोहोचली होती. तसेच आज कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी घसरून 247.95 रुपयांच्या लेव्हलवर बंद झाला आहे.4 / 10अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड - 16.29 टक्के - 1 एप्रिल 2019 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 387.15 रुपयांवर होती. यानंतर 12 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचा शेअर 938.20 रुपयांवर होता. अदानी पोर्ट्सचा शेअर आज 16.29 टक्क्यांनी म्हणजेच 116.20 रुपयांनी घसरून 596.95 वर बंद झाला.5 / 10अदानी विल्मर लिमिटेड - 5.00 टक्के - कंपनीच्या शेअर लिस्टिंगनंतर, 8 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचा स्टॉक 268.25 रुपयांवर होता. यानतंर, केवळ 2 महिन्यांनंतर, म्हणजेच 27 एप्रिल 2022 रोजी कंपनीचा शेअर 841 वर म्हणजेच रिकॉर्ड लेव्हलवर पोहोचला. अदानी विल्मर लिमिडेटचा शेअर आज 5 टक्के म्हणजेच 27.20 रुपयांनी घसरून 516.85 वर बद झाला.6 / 10अदानी टोटल गॅस लिमिटेड - 20.00 टक्के - या कंपनीचा शेअर 1 एप्रिल 2019 रोजी 130.10 रुपयांवर होता. 16 जानेवारी 2023 रोजी तो 3918.90 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीचे शेअर आज 20 टक्क्यांनी कोसळले आहेत. आज स्टॉकमध्ये 732.00 रुपयांची घसरण दिरून आली आहे. यानंतर हा शेअर 2928.00 रुपयांवर बंद झाला आहे.7 / 10अदानी ट्रांसमिशन लिमिटेड - 20 टक्के - 1 एप्रिल 2019 रोजी कंपनीचा शेअर 219.70 रुपयांवर होता. 12 सप्टेंबर 2022 रोजी तो 4094.75 रुपयांवर पोहोचला. आजच्या घसरणीनंतर, अदानी ट्रांसमिशन लिमिटेडचा शेअर 20.00 टक्क्यांनी अर्थात 503.55 रुपयांनी घसरून 2014.20 वर बंद झाला.8 / 10अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड - 20 टक्के - 1 एप्रिल 2019 चा शेअर 36.65 रुपयांवर होता. 25 एप्रिल 2022 रोजी कंपनीचा शेअर 2882.80 रुपयांवर होता. म्हणजेच केवळ 3 वर्षांतच कंपनीच्या शेअरने रेकॉर्डवर पोहोचला. आज अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 20 टक्के अर्थात 371.55 रुपयांनी घसरून 1486.25 रुपयांवर बंद झाला.9 / 10अंबुजा सिमेंट लिमिटेड - 17.33 टक्के - 1 एप्रिल 2019 रोजी कंपनीचा शेअर 224 रुपयांवर होता. 5 डिसेंबर 2022 रोजी तो 581 वर होता. आज अंबुजा सिमेंटचा शेअर 17.33 टक्के अर्थात 79.75 रुपयांनी कोसळत 380.45 वर बंद झाला.10 / 10 (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications