शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani Group : इकडे अर्थसंकल्प सादर झाला अन् तिकडे गौतम अदानींनी 1.85 लाख कोटी गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 6:32 PM

1 / 10
Adani Group : आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प 2023-24 केला. या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. पण, अदानी समूहासाठी आजचाही दिवस निराशाजनक ठरला. एफपीओ बंद झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये आज सर्वात मोठी घसरण झाली आणि कंपनीचे मार्केट कॅप 96,000 कोटी रुपयांहून अधिक बुडाले. अदानी समूहाच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमधून 1.85 लाख कोटी रुपये कमी झाले.
2 / 10
अदानी कंपन्यांचे किती नुकसान झाले? अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज 28.45 टक्क्यांनी घसरला आणि 846.30 रुपयांच्या तोट्यासह 2128.70 रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 96,478.29 कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 3,39,150.33 कोटी रुपये होते, ते आज 2,42,672.04 कोटी रुपयांवर आले आहे.
3 / 10
अदानी पोर्ट आणि एसईझेडचे शेअर्स आज 120.65 रुपयांनी म्हणजेच सुमारे 20 टक्क्यांनी घसरले आणि 492.15 रुपयांवर बंद झाले. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 26,062.07 कोटी रुपयांनी कमी झाले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 1,32,373.31 कोटी रुपये होते, आता 1,06,311.24 कोटी रुपयांवर आले.
4 / 10
अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आज 5 टक्के म्हणजेच 11.15 रुपयांची घसरण झाली आणि शेअर 212.75 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 4,300.48 कोटी रुपयांनी कमी झाले. एका दिवसापूर्वी, कंपनीचे मार्केट कॅप 86,356.86 कोटी रुपये होते, जे कमी होऊन 82,056.38 कोटी रुपये झाले.
5 / 10
अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये आज 2.46 टक्क्यांनी म्हणजेच 43.70 रुपयांची घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1730.25 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 4,874.7 कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 1,97,882.82 कोटी रुपये होते, ते आज 1,93,008.12 कोटी रुपयांवर आले आहे.
6 / 10
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर आज 5.78 कोटी रुपयांनी घसरला. कंपनीचा शेअर 70.70 रुपयांनी घसरून 1153.35 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 11,199.1 कोटी रुपयांनी कमी झाले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 1,93,893.49 कोटी रुपये होते जे 1,82,694.39 कोटी रुपयांवर खाली आले.
7 / 10
अदानी टोटल गॅसचा शेअर 10 टक्क्यांनी लोअर सर्किटला लागला आणि 211.25 रुपयांच्या घसरणीसह 1901.65 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 23,233.48 कोटी रुपयांवर आले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 2,32,378.86 कोटी रुपये होते, ते आज 2,09,145.38 कोटी रुपयांवर आले आहे.
8 / 10
अदानी विल्मरचा शेअर आज 5 टक्क्यांनी लोअर सर्किटला लागला आणि 23.30 रुपयांनी घसरून 443.60 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 3,028.25 कोटी रुपयांनी कमी झाले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 60,681.99 कोटी रुपये होते, आता 57,653.74 कोटी रुपयांवर आले.
9 / 10
अदानी सिमेंटच्या एसीसी शेअर्समध्ये आज 6.34 टक्क्यांनी म्हणजेच 125 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर 1844.40 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या मार्केट कॅपला 2,346.4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 36,981.88 कोटी रुपये होते, जे आज 34,635.48 कोटी रुपये आहे.
10 / 10
अदानी सिमेंटची दुसरी कंपनी अंबुजा सिमेंटचा शेअर आज 16.56 टक्क्यांनी म्हणजेच 66.40 रुपयांनी 334.60 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 13,184.68 कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 79,624.37 कोटी रुपये होते, ते आज 66,439.69 कोटी रुपयांवर आले आहे. गौतम अदानी यांच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये 1,84,707.4 कोटी रुपयांची घट झाली आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्प 2023