शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

DB Realty : अदानी समुह करणार ‘या’ रियल्टी कंपनीला मर्ज, डीलनंतर नाव बदलणार? शेअर्सना अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 2:30 PM

1 / 6
DB Realty : गौतम अदानी (Gautam Adani) भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट (Real estate) डील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांची आलिशान निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता अदानी रियल्टी मुंबईस्थित डीबी रियल्टीसोबत मर्ज होण्याची शक्यता आहे.
2 / 6
यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. हिंदू बिझनेसलाइनच्या वृत्तानुसार, अदानी रियल्टी मुंबईस्थित डीबी रियल्टीशी बोलणी करत आहे आणि जर हा करार झाला तर डीबी रियल्टीचे नाव अदानी रियल्टी असे केले जाईल. ही देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठी रियल्टी डील असू शकतो.
3 / 6
या डीलचं वृत्त समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून डीबी रियल्टीच्या शेअर्सला अपर सर्किट लागत आहे. बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यानंतर शेअर 98.75 रूपयांवर गेला.
4 / 6
यापूर्वी मंगळवारीही कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागलं होतं. कामकाजाच्या गेल्या पाच दिवसांमध्ये कंपनीचा शेअर 12.79 टक्क्यांनी वाढला आहे. यावर्षी वार्षिक आधारावर हा शेअर 101.94 टक्क्यांनी तर, गेल्या एका वर्षात या शेअरच्या किंमतीत 228.62 टक्क्यांची वाढ झाली.
5 / 6
डीबी रियल्टीकडे 100 मिलियन चौरस फुट आणि 628 एकरपेक्षा अधिक प्रमुख संपत्ती आहे. या कंपनीची सर्वाधिक मालमत्ता मुंबईमध्ये आहे. मर्जर डील पूर्ण झाल्यानंतर अदानी रियल्टीला लिस्ट करण्यात सुविधा मिळेल. डीबी रियल्टीमध्ये विनोद गोयनका, बलवा कुटुंबीय आणि अन्य काही लोकांच्या नेतृत्वात प्रमोटर्सनं कंपनीत जवळपास 69 टक्के हिस्सा ठेवला आहे.
6 / 6

टॅग्स :Adaniअदानी