शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! अदानी समुहाच्या शेअर्संनी घेतली मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 11:36 AM

1 / 9
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समुहावार घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले. अदानी प्रकरणाची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे.
2 / 9
हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरुद्ध अहवाल प्रकाशित केला होता आणि त्याच दिवसापासून त्यांच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली.
3 / 9
सोमवारी अदानी समूहासाठी एकामागून एक दिलासादायक बातम्या आल्या आहेत, त्यामुळे मंगळवारी अदानी समूहाच्या जवळपास सर्वच शेअर वाढले आहेत. यापैकी दोन स्टॉकमध्ये अप्पर सर्किट्स बसवण्यात आली. अदानी समूहाचे शेअर्स ग्रीनमध्ये असून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
4 / 9
सोमवारी NSE ने अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनची सर्किट मर्यादा 5 टक्क्यांवर सुधारित केली होती. याशिवाय, अदानी समूहाने तारण ठेवलेल्या समभागांची वेळेपूर्वी पूर्तता करण्याची घोषणा केली. यासाठी कंपनी 9185 कोटी रुपये देण्यास तयार आहे.
5 / 9
अदानी ट्रान्समिशनचे अहवाल समोर आले.यात कंपनीचे काम उत्कृष्ट होते. कंपनीच्या नफ्यात तब्बल 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवालानंतर मंगळवारी अदानी ट्रान्समिशनच्या समभागात 5 टक्क्यांची अप्पर सर्किट झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी अदानी विल्मारमध्येही 5 टक्क्यांचे वरचे सर्किट दिसून आले. हा शेअर 5 टक्क्यांनी लोअर सर्किटने उघडला.
6 / 9
अदानी ग्रीनमधील घसरण थांबली आहे. अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंटमध्ये तेजी आहे. याशिवाय सकाळी साडेनऊ वाजता अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
7 / 9
अदानी पॉवरमध्ये सध्या फक्त 5 टक्के लोअर सर्किट बसवण्यात आले आहे. इतर सर्व शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
8 / 9
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर होते, आता ते 21व्या स्थानावर घसरले आहेत.
9 / 9
फोर्ब्सच्या रिअल टाइम रेटिंगमध्ये, अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 17 व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 60.5 अब्ज डॉलरवर आली आहे.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय