शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठं नुकसान! अदानी समूहाच्या शेअर्सचा LIC ला हादरा; एकाच दिवसात 1439 कोटी स्वाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 11:30 AM

1 / 7
आर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट्सच्या (OCCRP) अहवालाने अदानी समूबाला मोठा झटका बसला आहे. OCCRP ने आपल्या अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या पोर्ट-टू-एनर्जी समूहावर स्टॉकमध्ये गोलमाल केल्याचा आरोप केला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण व्हायरला सुरवात झाली आणि बघता बघता समूहाचे हजारो कोटी रुपये स्वाहा झाले.
2 / 7
महत्वाचे म्हणजे, OCCRP च्या अहवालानंतर, भारतीय आयुर्विमा महामंडळालाही (LIC) मोठा फटका बसला आहे. कारण या विमा कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्या Mcap मध्ये झालेल्या घसरणीमुळे LIC लाही मोठा फटका बसला आहे.
3 / 7
अदानी समूहांचे सर्वच शेअर धढाम - एनएसईवर काल अदानी एंटरप्राइजेसचे शेअर 3.51 टक्क्यांनी घसरून बंद झाले. अदानी टोटल गॅसचा शेअर 2.24 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. अदानी एनर्जी सॉल्यूशन्सचा शेअर 3.53 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.76 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
4 / 7
...याशिवाय, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकचा शेअर 3.18 घसरून बंद झाला. एसीसीचा शेअर 0.73 टक्क्यांनी, अंबुजा सीमेंट्सचा 3.66 टक्क्यांनी, एनडीटीव्हीचा 1.92 टक्क्यांनी, अदानी पॉवरचा 1.93 टक्क्यांनी, तर अदानी विल्मरचा शेअर 2.70 टक्क्यांच्या घसरणीसह 31 ऑगस्टला बंद झाला.
5 / 7
किती मोठा फटका? - अदानी समूहाला गुरुवारी एकाच दिवसात 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक्सचेन्जच्या आकडेवारीनुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी सर्वच्या सर्व 10 शेअर्सचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळफास 10.84 लाख कोटी रुपये होते. मात्र 31 ऑगस्टला ते कोसळून जवळपास 10.49 लाख कोटीवर आले. अर्थात एकाच दिवसात अदानी ग्रुपला जवळपास 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
6 / 7
LIC चं नुकसान किती? 35,000 कोटी रुपयांपैकी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) केवळ एकाच सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले. LIC ने अदानी ग्रुपच्या सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
7 / 7
डेटाचा विचार करता, 30 जून रोजी एलआईसीचा अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी एंटरप्रायजेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, एसीसी आणि अंबुजा सीमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकचा वाटा होता.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीAdaniअदानीGautam Adaniगौतम अदानीInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजार