Adani Group's Strong Comeback; Earned 77 thousand crore rupees in just one hour
गौतम अदानींचे दमदार कमबॅक; अवघ्या एका तासात कमावले 77 हजार कोटी रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 3:02 PM1 / 5 Adani Shares: जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. पण, समूह हळुहळू यातून सावरत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी कंपन्यांचे शेअर्स दमदार कामगिरी करत आहेत. आता आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तुफान वाढ पाहायला मिळत आहे. 2 / 5 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त वेग पकडला आहे. अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्टचे शेअर्स 6 ते 7 टक्क्यांनी वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या एका तासात 77 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 14.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.3 / 5 अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, एनडीटीव्ही, अदानी विल्मार आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्सही वधारले. फक्त एसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 1.93 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी त्यांची एका दिवसातील सर्वोत्तम कामगिरी आहे. 4 / 5 राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाने ही वाढ सुरू झाली आहे. तसेच, ब्लूमबर्गच्या रिपोर्टने अदानी समूहाला मोठा दिलासा दिला. यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अधिकाऱ्याचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप निराधार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 5 / 5 दुसरीकडे शेअर बाजाराने आज नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स दुपारी 239.73 अंकांच्या वाढीसह 69,535.87 अंकांवर व्यवहार करत आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी 5021 हजार अंकांच्या जवळ पोहोचला. सध्या निफ्टी 43.90 अंकांच्या वाढीसह 20,899 अंकांवर व्यवहार करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications