शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्यांदाच ISRO नाही, तर बाहेरील खासगी कंपन्या तयार करणार PSLV; Gautam Adani देखील रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:20 AM

1 / 8
देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या (ISRO) बाहेरील खाजगी कंपन्या देखील पोलर सॅटेलाईट लाँच व्हेइकल (PSLV) बनवू शकणार आहेत. या कराराच्या शर्यतीत गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह आणि लार्सन अँड टुब्रो सोबत अन्य कंपन्यांचा समावेश आहे.
2 / 8
हे कंत्राट पाच लाँच व्हेइकल्स तयार करण्यासाठी असणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तीन संस्थांनी ३० जुलै रोजी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) द्वारे जारी आरएफपीच्या उत्तरात आपल्या बोली जारी केल्या होत्या असंही सूत्रांनी सांगितलं.
3 / 8
अंतराळ विभाग (डीओएस) अंतर्गत काम करणारं स्पेस-पीएसयू एनएसआयएलला सुरूवातीला इस्रोच्या एक कमर्शिअल (वाणिज्यिक) शाखेच्या रुपात मानलं गेलं होतं. नंतर लाँच व्हेइकल्सचं उत्पादन, उपग्रह आणि अधिक निर्मितीसह अनिवार्य करण्यात आलं.
4 / 8
टीओआयनं ऑगस्ट २०१९ मध्ये सांगितलं होतं NSIL ने पाच PSLV साठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) जाहीर केलं होतं, ज्याला पाच जणांकडून प्रतिसाद मिळाला. त्याचसाठी RFP नंतर डिसेंबर २०२० मध्ये जारी करण्यात आला.
5 / 8
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रोचं (एल अँड टी) एक कंसोर्टियम, दुसरा अदानी-अल्फा डिझाईन, बीईएल आणि बीईएमएल दोन ग्रुप एन्टिटी आहे. तर दुसरीकडे भारत हेव्ही इलेक्ट्रिकल लिमिटेडनं (बीएचईएल) एकल फर्मच्या रूपात बोली लावली आहे.
6 / 8
DoS च्या मते, हा करार केवळ केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देणार नाही, तर दरवर्षी आणखी उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रोची क्षमता वाढवेल.
7 / 8
“तंत्रज्ञान-व्यावसायिक स्तरावर मूल्यमापन चालू आहे, त्यानंतर निविदा उघडल्या जातील. आम्ही संपूर्ण प्रक्रिया काही महिन्यांत पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आणि यावर अधिक टिप्पणी करू शकत नाही,” अशी माहिती एनएसआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राधाकृष्णन डी यांनी टीओआयला दिली.
8 / 8
एका सूत्राने सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कंत्राट देणं अपेक्षित आहे. निवडलेली संस्था परवानाधारक उत्पादक असेल, तर इस्रोने नेहमीच उद्योगाच्या सोबत काम केलं आहे. कोणत्याही पीएसएलव्ही प्रक्षेपणात १५० पेक्षा जास्त मोठे आणि लहान उद्योग योगदान देत आहेत. पहिल्यांदाच हे पूर्णपमे उद्योग क्षेत्र म्हणजेच खासगी कंपन्यांद्वारे विकसित केलं जाणार आहे.
टॅग्स :Adaniअदानीisroइस्रोIndiaभारतMake In Indiaमेक इन इंडिया