शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अदानींना २.२९ अब्ज डॉलर्सचा झटका; आता 'या' चिनी अब्जाधीशापेक्षाही गेले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 4:23 PM

1 / 15
काही दिवसांपूर्वी अदानी समुहाच्या शअर्समध्ये झपाट्यानं वाढ होत होती. याच कारणामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.
2 / 15
ते रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकतात की काय असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु एका वृत्तानंतर अदानी समुहाच्या शेअर्सना उतरती कळा लागली आणि गौतम अदानी यांच्या यादीतील क्रमांकातही घसरण झाली.
3 / 15
एकेकाळी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योजक ठरलेल्या गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कायमच आहे. यामध्ये त्यांना २.२९ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.
4 / 15
आता ५७.४ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह आता ते जगातील अब्जाधिशांच्या लिस्टमध्ये २३ व्या स्थानावर आले आहेत. १४ जून रोजी आलेल्या एका मीडिया रिपोर्टनंतर अदानी समुहाच्याच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
5 / 15
आता गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानीस दुसऱ्या क्रमांकावर झोंग शानशान आणि तिसऱ्या क्रमांकावर मा हुएतेंग आहेत.
6 / 15
Bloomberg Billionaires Index नुसार गौतम अदानी यांना शुक्रवारी सकाळपर्यंत २.२९ अब्ज डॉलर्सचा फटका बसला होता. अदानी समुहाच्या सर्व सहा लिस्टेड कंपन्यांमध्ये शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली.
7 / 15
शुक्रवारी सकाळी १०.१४ वाजेपर्यंत अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) च्या शेअर्समध्ये ५ टक्के, अदाणी टोटल गॅस (Adani Total Gas) च्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.
8 / 15
तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स (APSEZ) च्या शेअर्समध्ये थोडी तेजी दिसून आली होती. तर दुसरीकडे अदानी पॉवर (Adani Power) च्या शेअर्समध्ये ३.०६ टक्क्यांची घसरण दिसून आली.
9 / 15
गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या कंपन्यांतून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एनएसडीएलकडून स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी अदानी समुहातील शेअरमधील घसरण थांबलेली नाही.
10 / 15
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा एकच पायरी दूर होते. तसंच त्यावेळी ते लवकरच अंबानी यांना मागे सारतील असे चित्र निर्माण झाले होते.
11 / 15
एनएसडीएलनं तीन परदेशी फंड्सची खाती सील केल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.
12 / 15
तसंच त्यांच्याकडे अदानी समुहाच्या ४३,५०० कोटी रूपयांचे शेअर्स असल्याचंही म्हटलं होतं परंतु अदानी समुहाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं.
13 / 15
Bloomberg Billionaires Index नुसार अॅमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील सर्वात मोठे अब्जाधिश आहेत. त्यांचं नेटवर्थ १९९ अब्ज डॉलर्स इतकं आहे.
14 / 15
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क हे १८५ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर फ्रान्सचे व्यावसायिक आणि जगातील सर्वात मोठी लग्झरी गुड्स कंपनी LVMD Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड आरनॉल्ट गे १७२ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
15 / 15
याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे चौथ्या कर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग हे १३२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजारamazonअ‍ॅमेझॉनRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीTeslaटेस्ला