अदानी समूह मध्यप्रदेशात सरकारी पॉवर ट्रान्समिशन कंपनीचं करणार अधिग्रहण; १२०० कोटींना झाला व्यवहार By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 3:12 PM1 / 6देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा व्यवसाय समूह लवकरच मध्यप्रदेशात पॉवर ट्रान्समिशन लाईन टाकणारी आणि त्याचं संचालन करणाऱ्या एका महत्त्वाच्या सरकारी कंपनीचं अधिग्रहण करणार आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला (ATL) या अधिग्रहणासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) प्राप्त झालं आहे. 2 / 6देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा व्यवसाय समूह लवकरच मध्यप्रदेशात पॉवर ट्रान्समिशन लाईन टाकणारी आणि त्याचं संचालन करणाऱ्या एका महत्त्वाच्या सरकारी कंपनीचं अधिग्रहण करणार आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला (ATL) या अधिग्रहणासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) प्राप्त झालं आहे. 3 / 6एमपी पॉवर ट्रान्समिशन पॅकेज -2 लिमिटेडच्या अधिग्रहणाचा करार १२०० कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. टॅरिफ अधारित लिलावाद्वारे कंपनीनं ही डील प्राप्त केली आहे. 4 / 6'अदानी समुहाची कंपनी ATL ला REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडद्वारे (RECPDCL) एमपी पॉवर ट्रान्समिशन पॅकेज २ लिमिटेडच्या अधिग्रहणातं लेटर ऑफ इंटेन्ट मिळालं आहे,' असं अदानीकडून सादर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे. 5 / 6REC पॉवर डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी लिमिडेट ही भारत सरकारच्या REC लिमिटेडटच्या पूर्ण स्वामित्व असलेली सब्सिडायरी आहे. याचाच अर्थ एमपी पॉवर ट्रान्समिशन पॅकेज २ लिमिटेड भारत सरकारचाच उपक्रम आहे. यावर आता लवकरच अदानी समुहाचं नियंत्रण येणार आहे. 6 / 6अदानी समुहाची कंपनी ATL या व्यवहाराद्वारे मध्यप्रदेशात ३५ वर्षांपर्यंत ट्रान्समिशन प्रोजेक्ट्सचं निर्मिती, संचालन आणि देखभालीचं काम पाहणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये ट्रान्समिशन लाईन आणि २२० किलोवॅट, १३२ किलोवॅट क्षमतेच्या अनेक एअर इन्सुलेटेड सबस्टेशन या प्रोजेक्टमध्ये सामिल आहे. १२०० कोटी रूपयांच्या या व्यवहारानं पूर्व मध्यप्रदेशात पॉवर ट्रान्समिशन सिस्टम मजबूत होण्याचा दावा केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications