शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adani Wilmar IPO : अदानींची कंपनी घेऊन आलीये कमाईची संधी; खुला झाला ३६०० कोटींचा आयपीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 4:41 PM

1 / 10
Adani Wilmar IPO : अदानी समुहाच्या (Adani Group) प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली अदानी विल्मरचा आयपीओ ( 3600 crore Rupees Adani Wilmar IPO) गुरुवारी खुला झाला आहे. अदानी समुहाची ही एफएमसीजी सेक्टरमधील (FMGC Sector) प्रमुख कंपनी आहे.
2 / 10
कंपनी Fortune ब्रँड नावाने खाद्यतेल, पीठ, तांदूळ आदी उत्पादनांची विक्री करते. कंपनीचा आयपीओ २७ जानेवारीला खुला झाला असून ३१ जानेवारी रोजी बंद होईल.
3 / 10
गौतम अदानी (Gautam Adani) यांनी १९९९ मध्ये सिंगापुरच्या Wilmar सोबत एकत्र येत या कंपनीची सुरूवात केली होती. या कंपनीमध्ये दोघांचाही ५०-५० टटक्के हिस्सा आहे. ही कंपनी खाद्य तेलाशिवाय, पीठ, तांदूळ, डाळ आणि सारखरेसारख्या आवश्यक वस्तूंचाही व्यवसाय करते.
4 / 10
ही देशात सर्वाधिक खाद्यतेल आयात करणारी कंपनी आहे. तर दुसरीकडे कॅस्टर ऑईलचंही सर्वाधिक निर्यात करणारी ही देशातील मोठी कंपनी आहे. देशात खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी आणि रिफाइन करण्यासाठी कंपनीकडे २२ प्रकल्प आहेत.
5 / 10
हे देशातील १० निरनिराळ्या राज्यांमध्ये स्थित आहेत. याशिवाय कंपनीची एक सब्सिडायरी बांगलादेश एडिबल ऑईल लिमिटेड (BEOL) देखील आहे.
6 / 10
अदानी विल्मरच्या खाद्यतेलाचे सर्वात मोठे ब्रँड नाव Fortune आहे, जे देशातील सर्वात मोठे खाद्यतेल ब्रँड आहे. परंतु कंपनी विविध किमतीच्या श्रेणींसाठी आणखी अनेक ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. यामध्ये King’s, Aadhar, Bullet, Raag, Alpha, Jubilee, Avsar, Golden Chef आणि Fryola यांचा समावेश आहे.
7 / 10
त्याची उपकंपनी BEOL ही बांगलादेशातील सर्वात मोठ्या खाद्य तेल कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी बांगलादेशच्या बाजारपेठेत रुपचंदा या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय Meizan आणि Veola सारखे ब्रँडही कंपनीकडे आहेत.
8 / 10
कंपनीने २०१२-१३ या आर्थिक वर्षात रेशनच्या वस्तूंच्या श्रेणीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि फॉर्च्युन ब्रँड नावाने मैदा, डाळी, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, साखर आणि सोया चंक्स विकण्यास सुरुवात केली. कंपनी ज्युबिली आणि गोल्डन शेफ सारख्या ब्रँड नावाने खाद्यपदार्थ विकते. त्याच वेळी, अलीकडे कंपनीने अलाइफ या ब्रँड नावाने साबण विकण्यासही सुरुवात केली आहे.
9 / 10
अदानी विल्मरचा आयपीओ २७ जानेवारीपासून सुरू झाला आहे. तो जानेवारीपर्यंत खुला असेल. यापूर्वी, कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून (Anchor Investors) ९४० कोटी रुपये उभे केले आहेत. या IPO (Adani Wilmar IPO Price Band) साठी २१८ ते २३० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
10 / 10
कंपनीने या इश्यूमधून ३,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना लॉटसाठी किमान १४,९५० रुपये गुंतवावे लागतील.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक