adani wilmar share price climb 19 per cent after a sluggish start up more than 42 per cent so far
Adani Wilmar शेअरमध्ये तेजी! २ दिवसांत ४२ टक्क्यांची वाढ; गुंतवणूकदार सुखावले By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 5:50 PM1 / 9शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या Adani Wilmar च्या शेअरची मोठी चर्चा होती. पेटीएमप्रमाणे अदानी विल्मचा शेअरही गुंतवणूकदारांची घोर निराशा करतो की काय, असा प्रश्न उभा राहिला होता. 2 / 9मात्र, अदानी ग्रुपच्या Adani Wilmar शेअरने लिस्टिंग होताच दोन दिवसांत तब्बल ४२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली. यामुळे गुंतवणूकदार चांगलेच सुखावल्याचे सांगितले जात आहे. भांडवली बाजारातील पदार्पणाची निराशा झटकून अदानी विल्मरच्या शेअरने तेजीची वाट धरली आहे.3 / 9सलग दोन सत्रात Adani Wilmar चा शेअर जवळपास ४२ टक्क्यांनी वाढला आहे. अदानी विल्मरच्या शेअरमध्ये १९ टक्के वाढ झाली. सध्या तो ३१५.८५ रुपयांवर आहे.आजच्या सत्रात त्याने ३१७.५० रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला आहे.4 / 9Adani Wilmar कंपनीने IPO साठी कंपनीने प्रती शेअर २३० रुपये किंमत ठेवली आहे. त्यातुलनेत मंगळवारी अदानी विल्मरची २२१ रुपयांना नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजारच्या मंचावर इश्यू प्राईसच्या तुलनेत तो ३.९ टक्के कमी दराने सूचीबद्ध झाला होता. 5 / 9मात्र, त्यानंतरच्या सत्रात तो १६ टक्के वाढीसह २६५.२० रुपयावर स्थिरावला होता. राष्ट्रीय शेअर बाजारात अदानी विल्मर १.३० टक्के घसरणीसह २२७ रुपायांवर सूचीबद्ध झाला होता.6 / 9मंगळवारच्या सत्रात सत्रात बीएसईवर अदानी विल्मरचे बाजार भांडवल ३४४६७.४८ कोटीपर्यंत पोहोचले. बुधवारी बाजार सुरू होताच अदानी विल्मरच्या शेअरला मोठी मागणी दिसून आली. काही मिनिटांत त्याने ३०० रुपयांची पातळी ओलांडली. 7 / 9बीएसईवर अदानी विल्मरचा भाव ३१३.६५ रुपये इतका आहे. त्यात १८.२७ टक्के इतकी वाढ झाली आहे. एनएसई वर तो ३१२.६५ रुपयांवर असून त्यात १६.५५ टक्के इतका वाढला आहे. बुधवारच्या सत्रात अदानी विल्मर शेअर ३१७.५० रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला आहे.8 / 9दरम्यान, अदानी विल्मरकडून समभाग विक्रीसाठी बोली प्रक्रिया २७ जानेवारी रोजी सुरु झाली होती आणि ३१ जानेवारी २०२२ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. या योजनेत किमान ६५ इक्विटी शेअरसाठी अर्ज करता येणार होता.9 / 9अदानी विल्मर शेअरसाठी प्रती शेअर २१८ ते २३० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ३.९२ पटीने सबस्क्राईब झाला. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा ५६ पटीने सबस्क्राईब झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications