Adar Punawala of Serum big Deal; buying Magma Fincorp
9 दिवसांत डबल पैसा! सिरमचे अदार पुनावाला आता ही बडी कंपनी विकत घेणार... By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 8:03 PM1 / 11कोरोना लसीमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला यांनी आज मोठी घोषणा केली आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी आहे. 2 / 11अदार पुनावाला यांची रायझिंग स्टार होल्डिंग कंपनी आता एक फायनान्स कंपनी विकत घेणार आहे. या कंपनीचे नाव मॅग्मा फिनकॉर्प आहे. MAGMA FINCORP मध्ये RISING STAR चा 60 टक्के वाटा असणार आहे. 3 / 11अदार पुनावाला MAGMA FINCORP ही कंपनी 3456 कोटींमध्ये विकत घेत असल्याचे समजले आहे. ही डील होण्याआधीच मॅग्माच्या शेअर्सना मोठा भाव आला आहे. 4 / 11मॅग्माचे शेअर एका आठवड्यात 55 रुपयांवरून थेट 93 रुपयांवर गेले आहेत. तर एका महिन्यात 41 रुपयांवरून 93 रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच शएअर धारकांची चांदीच चांदी झाली आहे. केवळ 9 दिवसांत हा शेअर 100 टक्क्यांनी उसळला आहे. 5 / 11आकडेवारीनुसार 25 जानेवारीला BSE वर मॅग्मा फिनकॉर्पचा शेअर 45.10 रुपयांवर होता. तर 11 फेब्रुवारीला शेअर वाढून 93.40 रुपयांवर पोहोचला. गुरुवारीदेखील कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे. 6 / 11या शेअरने गेल्या 6 ते 8 महिन्यांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा दिला आहे. 28 मे 2020 मध्ये या शेअरची किंमत केवळ 13.15 रुपये होती. एक्स्चेंज फायलिंगमध्ये मॅग्मा फिनकॉर्पने सांगितले की, कंपनीच्या संचालक मंडळाने या डीलला मंजुरी दिली आहे. 7 / 11अदार पुनावाला यांची कंपनी मॅग्मा फिनकॉर्पचा एक शेअर 70 रुपयांना खरेदी करणार आहे. असे 45.80 कोटी शेअर खरेदी करणार आहेत. यासाठी 3,456 कोटी रुपये मोजण्याचे ठरविले आहे. 8 / 11ही डील झाल्यानंतर मॅग्मा फिनकॉर्पचे नाव बदलण्यात येणार आहे. कंपनीचे नवीन नाव पुनावाला फायनान्स असे असणार आहे. तसेच अदार पुनावाला कंपनीचे संचालक मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. 9 / 11हा करार पूर्ण झाल्यावर मॅग्मा फिनकॉर्पची रायझिंग सन होल्डिंगमध्ये 60 टक्के भागीदारी होणार आहे. सध्याच्या मालकाची हिस्सेदारी ही 13.3 टक्क्यांवर येणार आहे. मॅग्मा फिनकॉर्प एक नॉन बँकिंग फाइनान्शियल कंपनी आहे.10 / 11या कंपनीचा व्यवसाय 21 राज्यांमध्ये पसरलेला आहे. कंपनीने NBFC कमर्शियल फायनान्स, अॅग्री फायनान्स, SME फायनान्ससह जनरल इन्शुरन्समध्ये सेवा देऊ केली आहे. 11 / 11सध्या या कंपनीचे लक्ष ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांकडेच आहे. या कंपनीच्या 297 शाखा आहेत. तसेच 50 लाख ग्राहक असून 15 हजार कोटींचे कर्ज वाटलेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications