शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६० पैशांच्या शेअरमधून छप्परफाड कमाई, १ लाखांच्या गुंतवणूकीनं बनवलं कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:29 PM

1 / 7
केवळ चांगल्याच फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये पोझिशन होल्ड करावी, असा सल्ला काय तज्ज्ञ देत असतात. अनेक शेअर्स (Stock Market) अल्पावधीत चांगले रिटर्न्स देऊ शकत नाहीत, पण दीर्घ मुदतीसाठी असे शेअर्स गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात.
2 / 7
असाच एक स्टॉक म्हणजे एजिस लॉजिस्टिक लि. (Aegis Logistics Ltd) कंपनीच्या समभागाने त्यांच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) रिटर्न दिले आहेत. गुंतवणूकदारांच्या 1 लाखांच्या गुंतवणूकीनं त्यांना कोट्यधीश केलंय. पाहूया कशी आहे या स्टॉकची कामगिरी.
3 / 7
शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 2.98 टक्क्यांच्या उसळीसह 266.50 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स गुरुवारी 258.80 रुपयांवर बंद झाले. 1 जानेवारी 1999 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 60 पैसे होती. तेव्हापासून आजपर्यंत (26 ऑगस्ट 2022) गुंतवणूकदारांना 44,316.67 टक्के रिटर्न दिले आहेत.
4 / 7
अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य 4.40 कोटी रूपये झालं असतं. गेल्या पाच वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना 40.34 टक्के रिटर्न दिले आहेत.
5 / 7
जर आपण गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोललो तर या शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 27.77 टक्के रिटर्न दिले आहेत. दरम्यान, एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अद्याप 0.78 टक्के तोटा सहन करावा लागला असेल.
6 / 7
6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. या दरम्यान कंपनीच्या शेअरच्या किमतीत 38.87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, या स्टॉकने गेल्या एका महिन्यात 2.96 टक्के रिटर्न दिले आहेत. 10 ऑगस्ट 2022 रोजी NSE वर कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. तेव्हा कंपनीच्या एका शेअरची किंमत 291 रुपयांपर्यंत पोहोचली होती.
7 / 7
त्याच वेळी, 28 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत 167.25 रुपयांपर्यंत घसरली होती. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक