शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१५ ॲागस्टनंतर SBIच्या 'या' विशेष स्कीममध्ये करता येणार नाही गुंतवणूक; अखेरची संधी, पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 9:16 AM

1 / 7
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक गुंतवणूकीच्या निरनिराळ्या स्कीम्स चालवत असते. यापैकीच एक स्कीम म्हणजे अमृत कलश योजना. ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये ग्राहकांना उत्तम परतावाही दिला जात आहे.
2 / 7
स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट अमृत कलश स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी अखेरचे काही दिवस उरले आहेत. या स्कीमची इन्व्हेस्टमेंट डेडलाईन जवळ आली आहे.
3 / 7
अशा परिस्थितीत जर तुम्हाला सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी आता गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं. सर्व वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि बँक मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर गुंतवणूकीवर मिळणारं व्याज देते.
4 / 7
स्टेट बँक त्यांच्या गुंतवणूकदारांना या डिपॉझिट स्कीममध्ये ४०० दिवसांच्या गुंतवणुकीच्या कालावधीसह अधिक व्याज देते. या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे.
5 / 7
गेल्या वेळी गुंतवणुकीची मुदत जूनमध्ये वाढवण्यात आली होती. सामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील एसबीआयच्या या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु दोन्ही कॅटेगरीमध्ये व्याजदर मात्र निरनिराळे निश्चित करण्यात आलेत.
6 / 7
स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेनं विशेष एफडी स्कीम अमृत कलशवर सामान्य नागरिकांना ७.१० टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतलाय. तर, बँकेनं ४०० दिवसांच्या कालावधीसह या एफडी स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आलीये.
7 / 7
यामध्ये गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. टीडीएस कापून व्याजाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय मुदतीपूर्वी जर रक्कम काढली तर डिपॉझिटच्या वेळी असलेल्या व्याजदरापासून ०.५० ते १ टक्के पेनल्टी आकारली जाते.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाInvestmentगुंतवणूक