शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एअर इंडियानंतर 'ही' एअरलाइन्स खरेदी करण्याच्या तयारीत टाटा, अदानीही रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 9:40 AM

1 / 7
काही महिन्यांपूर्वीच टाटा समूहानं देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात सामील करुन घेतली होती. आता टाटा आणखी एक विमान कंपनी आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबत या रेसमध्ये देशातील दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांचा अदानी समूहदेखील विमान कंपनी खरेदी करण्याच्या स्पर्धेत असल्याचं समोर आलंय.
2 / 7
श्रीलंका सरकार श्रीलंकन एअरलाइन्सच्या खासगीकरणावर गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी अनेक खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. सीएच-एव्हिएशनच्या (ch-aviation) रिपोर्टनुसार या यादीत अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या नावांचा सावेश आहे.
3 / 7
संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये एमिरेट्स (ईके, दुबई इंटरनॅशनल), टाटा सन्स आणि अदानी समूह यांसारख्या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये या विमानसेवेचा आवाका वाढला आहे.
4 / 7
श्रीलंकन ​​एअरलाइन्स येत्या हिवाळ्याच्या हंगामात कोलंबो आणि तिरुवनंतपुरम दरम्यान आपली सेवा वाढवण्याची योजना आखत आहे. आठवड्यातून ६ ते ७ वेळा ही सेवा वाढवण्याचा विचार केला जात आहे. तसंच कोची इंटरनॅशनलवर १० वेळा साप्ताहिक उड्डाणं सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
5 / 7
याशिवाय विमान कंपन्या कोझिकोडला जाण्यासाठी नवीन उड्डाण मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार, भारत आणि श्रीलंकादरम्यान हवाई वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. दोन्ही देशांमधील प्रवाशांच्या संख्येनं एअरलाइनसाठी सकारात्मक चित्र तयार केलंय.
6 / 7
टाटा सन्स, अदानी यांसारख्या कंपन्या विमान कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. टाटासन्स ज्यांना आधीच एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर एशिया सारख्या विमानसेवा चालवण्याचा अनुभव आहे. तर दुसरीकडे अदानी श्रीलंका सरकारच्या सहकार्यानं अनेक प्रकल्प राबवत आहे.
7 / 7
जुलैमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान गौतम अदानी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत श्रीलंकेतील अनेक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या बैठकीत विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली होती, परंतु त्यावेळी विमान कंपनीचा उल्लेख नव्हता.
टॅग्स :TataटाटाAdaniअदानीSri Lankaश्रीलंका