शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GST कौन्सिलच्या बैठकीनंतर आता खिशावर भार; काय स्वस्त, काय महाग; पाहा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:24 AM

1 / 10
GST Council Meeting Updates: मंगळवारी जेव्हा तुम्ही झोपण्याच्या तयारीत होता, त्यावेळी एक मोठी बैठक सुरू होती. या बैठकीतील निर्णयांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. जीएसटी कौन्सिलची ५० वी बैठक रात्री उशिरा संपली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
2 / 10
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयानंतर काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही वस्तूंच्या किंमती आता वाढणार आहेत. काहींवर जीएसटीचे दर वाढवण्यात आले तर काहींवर दिलासा देण्यात आला.
3 / 10
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे काही सेवा आणि वस्तूंवर जीएसटी वाढवण्याचा किंवा लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 / 10
जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत या वस्तू आणि सेवांच्या किमतीत बदल होणार आहेत. आपण त्या वस्तूंची यादी पाहू, ज्यांच्या किंमतीत येत्या काळात वाढ किंवा घट होणार आहे.
5 / 10
जीएसटी कौन्सिल ऑनलाइन गेमिंगवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत होती. यावेळी कौन्सिलनं ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ऑनलाइन गेमिंग, कसिनो, हॉर्स रेसिंग महाग होतील.
6 / 10
मल्टी युटिलिटी आणि क्रॉसओव्हर युटिलिटी (XUV) श्रेणीतील वाहनांवर २२ टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अनेक वाहने महागणार आहेत.
7 / 10
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर, एसयूव्हीवर २८ टक्के जीएसटी व्यतिरिक्त २२ टक्के कम्पेन्सेशन सेस लागू केल्यानं वाहनं महाग होतील. यासाठी एसयूव्हीचे पॅरामीटर्स निश्चित करण्यात आले आहेत.
8 / 10
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर सिनेमागृहातील खाण्यापिण्याचे पदार्थ स्वस्त होणार आहेत. आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
9 / 10
सॅटलाईट सर्व्हिस लाँच स्वस्त होणार. जीएसटी कौन्सिलनं खासगी ऑपरेटर्सच्या जीएसटी उपग्रह प्रक्षेपण सेवेला सूट दिली आहे. कच्च्या आणि न तळलेल्या स्नॅक पॅलेट्सवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय.
10 / 10
फिश पेस्टवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर कृत्रिम जरीच्या धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के आणि एलडी स्लॅगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय.
टॅग्स :GSTजीएसटीnirmala sitharamanनिर्मला सीतारामन