शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio आणि Airtel नंतर आणखी एका कंपनीनं सुरू केली 5G सेवा, 'या' ठिकाणी मिळतेय सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 2:28 PM

1 / 8
Vi 5G Launch In India: जिओ आणि एअरटेलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली होती. दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांचे 5G नेटवर्क सतत वाढवत आहेत. जिथे Jio ने या वर्षाच्या अखेरीस देशात 5G सेवा पूर्णपणे सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तर एअरटेल पुढील वर्षी एप्रिलपर्यंत देशभरात आपली सेवा पूर्णपणे सुरू करणार आहे.
2 / 8
आता या यादीत तिसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरचे नावही जोडलं जात आहे. व्होडाफोन आयडियानं (Vodafone Idea) त्यांची 5G सेवा पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी लाईव्ह केली आहे. कंपनीनं आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली. मात्र, कंपनीने कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेलं नाही.
3 / 8
कंपनीनं आपल्या वेबसाइटवर सर्व सेवांची माहिती देताना, आपल्या 5G सेवेबद्दल माहिती देखील दिली आहे. व्होडाफोन आयडियाची 5G सेवा पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अनुभव तुम्ही व्होडाफोन आयडियाच्या 5G रेडी सिमच्या मदतीने घेऊ शकता, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
4 / 8
कुमार मंगलम बिर्ला यांनी IMC 2023 मध्ये याबाबत माहिती दिली होती. कुमार मंगलम बिर्ला हे व्होडाफोन आयडियाच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. गेल्या एका वर्षात व्होडाफोन आयडिया टीमनं 5G लाँच करण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्यासाठी खूप काम केले आहे. येत्या तिमाहीत, कंपनी 5G रोलआउट आणि 4G विस्तारासाठी लक्षणीय गुंतवणूक करणार असल्याचं ते म्हणाले होते.
5 / 8
नुकत्याच झालेल्या IMC 2023 मध्ये, Vodafone Idea ने IoT, 5G, Cloud यासह सर्व तंत्रज्ञानाचं प्रदर्शन केले होते. याशिवाय, कंपनीनं Vi AirFiber, Vi गेम्स - क्लाउड प्ले, VR गेम्ससह विविध सोल्यूशन सादर केले होते. Vi नं दाखवलेले बहुतेक सोल्यूशन्स कंपनीच्या 5G नेटवर्कवर आधारित होते.
6 / 8
व्होडाफोन आयडिया भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे, ब्रँडच्या ग्राहकांची संख्या झपाट्यानं कमी झालीये आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, जुलै 2023 मध्ये व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 22.8 कोटी होती. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ARPU 142 रुपये होता.
7 / 8
नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीला एक दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आयकर विभागाला (Income Tax Department) व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (Vodafone Idea Limited) 1128 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
8 / 8
व्होडाफोन आयडियानं 2016-2017 च्या मूल्यांकन वर्षासाठी कर दायित्वापेक्षा जास्त कर म्हणून भरलेली ही रक्कम आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये विभागाद्वारे पास असेसमेंट ऑर्डर कालबद्ध होती, त्यामुळे ती टिकू शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं.
टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ