after pnb SBI Launches Video KYC Based Savings Account Opening For Customers
State Bank ची ग्राहकांसाठी नवी सुविधा; घरबसल्या Video KYC द्वारे खातं उघडण्याची संधी By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 6:02 PM1 / 10भारतीय स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी एक नवी योजना आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना घरबसल्या YONO अॅपचा वापर करून व्हिडीओ केव्हायसीद्वारे बचत खातं उघडता येणार आहे. 2 / 10शुक्रवारी बँकेनं यासंदर्भातील माहिती दिली. आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि चेहऱ्याची ओळख करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.3 / 10ही पूर्णपणे संपर्कहीन आणि कागदविरहित ही सुविधा असल्याचं स्टेट बँकेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. 4 / 10ग्राहकांची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली. 5 / 10यामुळे मोबाईल बँकिंगला एक नवा आयाम मिळेल आणि ग्राहकांना त्यांच्या बँकिंगशी निगडित गरजा डिजिटल बनवण्यास सक्षम ठरतील, असंही ते म्हणाले. 6 / 10ज्यांना स्टेट बँकेत नवं बचत खातं सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 7 / 10या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम स्मार्टफोनवर योनो हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. 8 / 10त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या न्यू टू एसबीआयवर क्लिक करून इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाऊंट निवडावं लागेल.9 / 10अॅपमध्ये आपलं आधार कार्ड क्रमांका टाकून आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची माहिती भरावी लागेल. 10 / 10त्यानंतर व्हिडीओ कॉल शेड्युल करावा लागेल. व्हिडीओ केव्हायसी यशस्वी झाल्यानंतर ग्राहकांचं खातं उघडलं जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications