After the success in America, 'Amul' will now step into Europe Market
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल! By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 4:57 PM1 / 7अमूल दूध भारतात प्रसिद्ध आहे. देशातील कानाकोपऱ्यात अमूलने जाळे तयार केले आणि व्यवसायाचा विस्तार केला. अमूल परदेशात व्यवसाय वाढवण्याची योजना बनवली आणि अमेरिकेची निवड केली. 2 / 7अमूलने अमेरिकेत दूध लॉन्च केले आणि यशही मिळाले. अमेरिकेतील यशस्वी वाटचालीनंतर आता कंपनीने युरोपमध्ये पाऊल ठेवण्याची योजना तयार केली आहे. 3 / 7गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने युरोपच्या बाजारात उतरण्याची तयारी केली आहे. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी एका खासगी एमबीए कॉलेजच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. 4 / 7'भारत आता जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे आणि येणाऱ्या काळात जगातील एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतीयांश दूध उत्पादन भारतात होईल. डेअरी एक व्यवसाय नाही, तर ग्रामीण भारताची जीवनवाहिनी आहे', असेही ते म्हणाले. 5 / 7अमूल दररोज ३१० लाख लिटर दूध संकलित करते आणि १०७ डेअरी प्लॅण्ट आहेत. अमूलचा व्यवसाय आता ८०,००० कोटी रुपयांचा झाला आहे. 6 / 7अमूल जगातील सर्वात मोठी दूध डेअर आणि फूड ब्रॅण्ड बनला आहे. ३६ लाख शेतकऱ्यांकडे अमूलची मालकी म्हणजे हिस्सेदारी आहे.7 / 7अमूलने भारतात विस्तार केल्यानंतर पहिल्यांदा परदेशात व्यवसाय वाढवण्यासाठी अमेरिकेची निवड केली होती. अमेरिकेत व्यवसाय वाढवण्याची योजना यशस्वी झाल्यानंतर आता युरोपच्या बाजारात उतरण्याची तयारी केली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications