after yes bank lakshmi vilas bank facing financial problems kkg
येस बँकेपाठोपाठ आणखी एक बँक संकटात; 90 वर्षे जुनी बँक डबघाईला By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 4:02 PM1 / 11आर्थिक अडचणीत सापडलेल्या येस बँकेची अवस्था सध्या अतिशय गंभीर आहे. भरमसाठ वाटलेली कर्जे बुडाल्यानं बँक अडचणीत सापडलीय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लादले आहेत.2 / 11येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं पुनर्गठन योजनेची तयारी केलीय. या योजनेअंतर्गत एसबीआयनं येस बँकेतला ४९ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. 3 / 11एसबीआयसोबतच ऍक्सिस, कोटक महिंद्रा, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकांनीसुद्धी येस बँकेत गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय. 4 / 11येस बँकेप्रमाणेच देशातील आणखी एक बँकदेखील संकटात सापडलीय. ही बँक ९० वर्षांहून जुनी आहे. 5 / 11खासगी क्षेत्रातल्या लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ (सीएआर) मोठ्या प्रमाणात घसरला आहे. बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ किमान ९ टक्के असायला हवा. लक्ष्मी विलास बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ ३.४६ टक्क्यांवर आलाय. 6 / 11बँकेकडील ठेवी सीएआरच्या माध्यमातून मोजल्या जातात. बँक किती जोखीम पत्करू शकते, याची टक्केवारी सीएआरमधून समजते. 7 / 11लक्ष्मी विलास बँकेत हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार प्रयत्नशील आहेत. यामध्ये कोटक बँकेचादेखील समावेश आहे. 8 / 11आरबीआयनं गेल्या वर्षी लक्ष्मी विलास बँकेवर कठोर कारवाई केली होती. बँकेवर काही निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. याशिवाय नवी शाखादेखील उघडू शकत नाही. 9 / 11आरबीआयनं लक्ष्मी विलास बँकेला पीसीए फ्रेमवर्कमध्ये टाकलं. एखाद्या बँकेचं उत्पन्न अतिशय कमी असल्यास, तिचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज वाढल्यावर अशा प्रकारची कारवाई होते. 10 / 11लक्ष्मी विलास बँकेनं मध्यंतरी इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्ससोबत विलनीकरण करण्याची तयार केली होती. याबद्दलचा प्रस्ताव बँकेनं आरबीआयला पाठवला. मात्र आरबीआयनं प्रस्ताव फेटाळून लावला. 11 / 11लक्ष्मी विलास बँकेच्या देशात ५६९ शाखा असून १०४६ एटीएम आहेत. तर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सच्या देशभरात २२० हून अधिक शाखा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications