शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१६ व्या वर्षीच ईशा अंबानी बनली होती ४६० कोटींची मालक, Forbes च्या यादीतही नाव; जाणून घ्या तिच्याबद्दल खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 9:24 AM

1 / 10
रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Reliance Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) फोर्ब्सच्या (Forbes) जगातील अब्जाधीशांच्या वारसांच्या (टूबी) यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या यादीत सामील झालेल्या पहिल्या १० महिलांच्या यादीत नीता अंबानींची मुलगी ईशा अंबनी ही सर्वात कमी वयात हा पल्ला गाठणारी आहे.
2 / 10
ईशा अंबानी जेव्हा १० वर्षांची होती तेव्हा तिचं नाव फोर्ब्सच्या प्रमुख १० उत्तराधिकारींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होतं.
3 / 10
त्यावेळी ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ८० मिलियन डॉलर्सच्या शेअर्सची मालक बनली होती. २००८ मध्ये तिची एकूण संपत्ती ४६० कोटी रूपये इतकी होती.
4 / 10
ईशा अंबानीनं येल युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड ग्रेज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून आपलं शिक्षण घेतलं आहे. तिचा विवाह व्यावसायिक आनंद पिरामल यांच्यांशी २०१८ मध्ये झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ईशा अंबानीचीही महत्त्वाची भूमिका आहे.
5 / 10
ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलची बोर्ड मेंबरही आहे. मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानीला ४० व्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये इंट्रोड्यूसही केलं होतं.
6 / 10
ईशा अंबानी रिलायन्स इन्फोकॉमची डायरेक्टरही आहे. तिनेच जिओ फोनही (Jio Phone) लाँच केला होता. डिसेंबर २०१५ मध्ये तिनं रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) 4G सेवांची सुरुवात करण्याची घोषणाही केली होती.
7 / 10
तिनं २०१६ मध्ये ऑनलाइन रिटेल फॅशन ब्रॅन्ड AJIO देखील लाँच केला होता. २०१४ मध्ये ईशानं न्यूयॉर्क येथील McKinsey या कंपनीत बिझनेस अॅनालिसिस्ट म्हणूनही काम केलं होतं.
8 / 10
ईशा अंबानीचं नाव आशियाच्या सर्वात सामर्थ्यवान १२ भावी व्यावसायिक महिलांच्या यादीतही समाविष्ट करण्यात आलं होतं.
9 / 10
ईशा अंबनीकडे जबरदस्त मॅनेजमेंट स्कील असल्याचं म्हटलं जातं. ईशानं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये आपला भाऊ आकाश अंबानी याच्यासह जिओ ग्लास सादर केला होता.
10 / 10
ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांना अगदी सामान्य वातावरणात मोठं केलं असल्याची माहिती नीता अंबानी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली होती. त्यांना शाळेत जाताना शुक्रवारी केवळ ५ रूपयांचा पॉकेटमनी दिला जात होता, असं त्यांनी सांगितलं होतं.
टॅग्स :Isha Ambaniईशा अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीRelianceरिलायन्सForbesफोर्ब्स