शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 8:59 AM

1 / 9
Priyanka Gandhi Networth : वायनाडमध्ये येत्या १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहेत. तसंच २० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केले जाणारेत. यावेळी वायनाडमधून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी काँग्रेस उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
2 / 9
प्रियांका गांधी यांनी १२ कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात त्यांचं एकूण उत्पन्न ४६.३९ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये भाड्यातून मिळणारं उत्पन्न तसंच बँकांचं व्याज आणि इतर गुंतवणुकीचा समावेश असल्याचं त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात म्हटलंय.
3 / 9
उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती आणि दायित्वांचा तपशील प्रियांका गांधींनी दिलाय. यानुसार त्यांच्याकडे ४.२४ कोटी रुपयांहून अधिक जंगम मालमत्ता आहे. यामध्ये तीन बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या रकमेच्या ठेवी, म्युच्युअल फंड आणि पीपीएफमधील गुंतवणूक, तसंच त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी भेट दिलेली होंडा सीआरव्ही कार आणि सव्वा कोटी रुपयांचं ४४०० ग्रॅम सोन्याचा समावेश आहे.
4 / 9
प्रियांका यांची स्थावर मालमत्ता ७.७४ कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये नवी दिल्लीतील महरौली परिसरातील वारसा हक्कानं मिळालेली शेतजमीन आणि त्या ठिकाणी असलेल्या फार्महाऊस इमारतीच्या अर्ध्या भागाचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत आता २.१० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
5 / 9
त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला येथे त्यांची स्वत:ची निवासी मालमत्ता आहे, ज्याची सध्याची किंमत ५.६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रियांका गांधींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पतीच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशीलही दिला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे ३७.९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि २७.६४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
6 / 9
प्रतिज्ञा पत्रानुसार प्रियांका गांधींनी म्युच्युअल फंडात २ कोटी २४ लाख ९३ हजारांची गुंतवणूक केली आ हे. त्यांच्याकडे ३ बँक खाती आहेत, ज्यामध्ये ३ लाख ६१ हजारांची रक्कम आहे. ३० सप्टेंबर पर्यंत त्यांच्याकडे ५२ हजार रुपयांची कॅश होती. त्यांच्या पीपीएफ अकाऊंटमध्ये १७ लाख ३८ हजार २६२ रुपये आहेत.
7 / 9
याशिवाय त्यांच्याकडे ५९.८३ किलो चांदीनं बनलेल्या वस्तू आहेत. त्यांचं मूल्य २९,५५,५८१ रुपये आहे. तसंच त्यांच्याकडे ४.४१ किलोची ज्वेलरी आहे. त्यातील २.५ किलो सोन्याच्या आहेत. याचं मूल्य १ कोटी १५ लाख ७९ हजार रुपये आहे.
8 / 9
प्रियांका गांधी यांनी ब्रिटनच्या विद्यापीठातून दूरस्थ शिक्षणाद्वारे बुद्धिस्ट स्टडीजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात बीए ऑनर्सची पदवी घेतली आहे. त्यांच्यावर १५ लाख ७५ हजार रुपयांची देणी आहे.
9 / 9
२०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी वर्षासाठी प्राप्तिकर पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेलाही सामोरं जावं लागत असून, त्यानुसार त्यांना १५ लाख रुपयांहून अधिक कर भरावा लागणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४