Ahana Gautam iit graduate quit job to start snacks business built rs 100 cr turnover company
भारीच! 30 व्या वर्षी 100 कोटींचा व्यवसाय; अमेरिकेतील नोकरी सोडली, सुरू केला स्टार्टअप By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:03 AM1 / 12आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं हे इंजिनिअरिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक व्य़क्तीचं स्वप्न असतं. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर लाखोंच्या पॅकेजसह नोकरी ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. अशा एका तरुणीची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. 2 / 12आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली, त्यानंतर अमेरिकेत नोकरीबरोबरच शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मात्र या मुलीने आपल्या करिअरच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर नोकरी सोडली. 3 / 12नोकरी सोडण्यामागचं कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या तरुणीने स्नॅक्स विकण्यासाठी हे पाऊल उचललं. ही तरुण महिला उद्योजिका आपल्या व्यवसायासह स्टार्टअप उद्योगात हळूहळू आपला ठसा उमटवत आहे.4 / 12गेल्या 10 वर्षांत भारतात स्टार्टअप कल्चर वेगाने वाढत आहे. अनेक तरुणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तरुण उद्योजकांच्या या लिस्टमध्ये अहाना गौतमचं नाव येतं. तिची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...5 / 12आयआयटीमधून इंजिनीअरिंग केल्यानंतर अहाना गौतम अमेरिकेत तिच्या करिअरमध्ये चांगलीच स्थिरावली होती. पण, वयाच्या 30 व्या वर्षी अहानाचा नोकरीबद्दल मोठा निर्णय घेतला. 6 / 12अहानाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यूएसमध्ये नोकरी हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं पण अहानाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचे होतं त्यामुळे तिने मोठी रिस्क घेतली.7 / 12आरोग्यदायी स्नॅक्स विकण्यासाठी अहानाने तिचा स्टार्टअप 'ओपन सिक्रेट' सुरू केला. अमेरिकेत राहताना तिला होल फूड्स स्टोअरला भेट देण्याची संधी मिळाली, जिथे निरोगी अन्नाची गरज आणि महत्त्व समजलं. त्यानंतर तिने हेल्दी स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.8 / 12अहानाने अमेरिकेतील नोकरी सोडली आणि भारतात आली. डीएनए रिपोर्टनुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला तिच्या आईचीही मदत मिळाली. 2019 मध्ये अहानाने ओपन सीक्रेट स्टार्टअप सुरू केलं.9 / 12हा स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी अहाना गौतमने अनेक FMCG कंपन्यांमध्ये कामही केलं होतं. यावेळी तिला रिफाइंड साखर, मैदा, आर्टिफिशियल कलर आणि चवीने भरलेल्या जंक फूडची माहिती मिळाली. 10 / 12जंक फूड फ्री स्नॅक्सची कल्पना अहानाच्या मनात आली. डीएनए रिपोर्टनुसार, आजपर्यंत अहाना गौतमच्या स्टार्टअप ओपन सीक्रेटचे व्हॅल्यूएशन 100 कोटी रुपये आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. 11 / 12जंक फूड फ्री स्नॅक्सची कल्पना अहानाच्या मनात आली. डीएनए रिपोर्टनुसार, आजपर्यंत अहाना गौतमच्या स्टार्टअप ओपन सीक्रेटचे व्हॅल्यूएशन 100 कोटी रुपये आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. 12 / 12जंक फूड फ्री स्नॅक्सची कल्पना अहानाच्या मनात आली. डीएनए रिपोर्टनुसार, आजपर्यंत अहाना गौतमच्या स्टार्टअप ओपन सीक्रेटचे व्हॅल्यूएशन 100 कोटी रुपये आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications