शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 2:59 PM

1 / 9
टाटा (TATA) समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी मोठी डील केली. या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे.अमेरिकेत १० लाख नोकऱ्या मिळणार आहेत. यासह भारतातही नोकऱ्या मिळणार आहेत.
2 / 9
एअर इंडियाने एअरबस आणि बोइंगकडून एकूण ४७० वाइड बॉडी आणि नॅरो बॉडी विमाने खरेदी करणार आहेत. यात ४० एअरबस ए ३५० एस, २० बोइंग ७८७ आणि १० बोइंग ७७७-९ एस वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे. तसेच, २१० एअरबस ए ३२०/ ३२१ निओस आणि १९० बोइंग ७३७ मॅक्स यांचा समावेश आहे. या डीलमुळे भारतात नवीन ३.६० लाख नोकऱ्या मिळणार आहेत.
3 / 9
या डीलमुळे भारतात ३.६० लाख नोकऱ्या नोकऱ्या तयार होणार आहेत. यात ६० हजार जणांना डायरेक्ट नोकऱ्या तर ३ लाख नोकऱ्या अप्रत्यक्ष असू शकतात.
4 / 9
या करारामुळे फक्त अमेरिकेलाच नाही तर भारतालाही फायदा होईल, असा विश्वास विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही वर्षांत देशात नवी ४७० विमाने भारतात येणार आहेत. त्यामुळे देशात ६० हजार थेट नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अप्रत्यक्ष निकषांच्या श्रेणीत ३ लाख नोकऱ्या निर्माण होतील, असही बोलले जात आहे.
5 / 9
भारतात विमान वाहतूक उद्योगात फक्त ऑपरेशनल कामाला वाव आहे. अमेरिकेच्या तुलनेत येथे रोजगार निर्मिती कमी आहे. या करारामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी भर पडेल आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात भारताची मोठी वाढ दिसून येईल.
6 / 9
जून 2022 नुसार सध्या एअर इंडियाकडे 12 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यापैकी 8 हजारांहून अधिक संख्याबळ कायमस्वरूपी असून 4 हजार कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर आहेत.
7 / 9
येत्या काही वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त होणार असून, अनेक कर्मचाऱ्यांचा करारही संपणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एअर इंडियामध्ये मोठी नोकरभरती होणार असल्याचे बोलले जात आहे. यासह इतर कंपन्याही बदल करणार असल्याचे बोलले जात आहे.
8 / 9
येणाऱ्या ८ वर्षात एअर इंडियाकडे ४७० नवीन विमाने येणार आहेत. टाटा ग्रुपने अमेरिकेतील बोइंगसोबत २२० विमानांची डिल केली आहे. हा करार सुमारे ३४ अब्ज डॉलर्सचा आहे. या डीलमध्ये एअर इंडियाला आणखी ७० विमाने खरेदी करण्याची संधी असेल, त्यानंतर हा करार ४५ अब्ज डॉलर्सचा असणार आहे.
9 / 9
या करारामुळे अमेरिकेत दहा लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. दुसरीकडे, एअर इंडियाने फ्रेंच कंपनी एअरबससोबत २५० विमानांसाठी करार केला आहे, यामध्ये १०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार होणार आहे. यासाठी एअर इंडियाने वाइड बॉडी विमानाच्या निर्मितीसाठी ४० हजार कोटी डॉलर्स खर्च करणार आहेत.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाRatan Tataरतन टाटा