शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटणार? टाटा मोठ्या निर्णयाच्या तयारीत, लवकरच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 2:54 PM

1 / 8
काही महिन्यांपूर्वी नोकरी जाईल की काय या चिंतेत असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं आहे. टाटा समूहानं एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नशीब फळफळलं आहे. कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी टाटा समूह महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
2 / 8
देशातील सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठित हवाई वाहतूक कंपनी अशी एअर इंडियाची एकेकाळची ओळख होती. मात्र लालफितीचा कारभार, खराब व्यवस्थापन, खासगी कंपन्यांची स्पर्धा यामुळे एअर इंडिया मागे पडली. मात्र आता टाटा समूहानं एअर इंडियाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
3 / 8
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाची अवस्था बिकट आहे. कंपनी सरकारच्या ताब्यात असताना ती बुडेल की काय अशी भीती होती. मात्र टाटा समूहाकडे येताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत.
4 / 8
टाटा समूह एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता कर्मचाऱ्यांना थेट कंपनीत हिस्सा दिला जाईल. त्यामुळे कर्मचारी कंपनीत भागीदार होतील.
5 / 8
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनचा फायदा मिळू शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनी अधिक 'आपली' वाटेल आणि ते अधिक उत्तम काम करतील, असं टाटा समूहाला वाटतं.
6 / 8
कंपनीच्या शेअरच्या किमतीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या एअर इंडियाच्या प्रतिस्पर्धी असलेल्या इंडिगो आणि स्पाईसजेट कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनचा लाभ दिला आहे.
7 / 8
एअर इंडिया सरकारच्या ताब्यात असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) योजनांचा लाभ मिळत नव्हता. मात्र एअर इंडिया टाटांकडे येताच बऱ्याच गोष्टी बदलल्या. ईपीएफओच्या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळू लागला.
8 / 8
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना १५ मेपासून मोठा फायदा मिळेल. १५ तारखेपासून कर्मचाऱ्यांना नव्या ग्रुप मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांना देशभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा मिळतील.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटा