शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air India makeover: ‘टेकओव्हर’नंतर आता होणार ‘मेकओव्हर’, Air India च्या एअर हॉस्टेसही दिसणार नव्या रुपात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 1:05 PM

1 / 7
Air India grooming rules: एअर इंडिया (Air India) अखेर सात दशकांनंतर टाटा समूहाकडे परतल्यानंतर आता काही गोष्टी बदलू लागल्या आहेत. एअर इंडियामध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. आता एअर इंडियामध्ये एअर होस्टेस आणि क्रू मेंबर (cabin crew members) नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. आता एअर इंडियाने आपल्या केबिन क्रू सदस्यांसाठी ग्रूमिंग गाईडलाईन्स जारी केले आहेत. यासाठी ग्रूमिंग गाईडलाईन्सची (Air India grooming rules) तपशीलवार यादी देण्यात आलीये.
2 / 7
केबिन अटेंडंटने कशाप्रकारे राहावे हे यात स्पष्ट करण्यात आलेय. त्याचबरोबर त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याबाबतही माहिती देण्यात आलीये. यामध्ये महिला क्रू मेंबर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वांची यादी (Air India grooming rules) थोडी मोठी आहे.
3 / 7
यामध्ये पुरुष क्रू मेंबर आणि महिला क्रू मेंबर यांनी कोणता लूक ठेवावा हे सांगण्यात आले आहे. केबिन क्रू मेंबर्सना त्यांच्या लूकवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांचे केस कमी आहेत अशा पुरूष केबिन क्रू मेंबर्ससाठीही काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलीयेत. त्याचबरोबर एअर होस्टेसने कोणत्या गोष्टी परिधान करू नयेत हे देखील सांगितले आहे.
4 / 7
महिला क्रू मेंबर्सना बांगड्यांपासून टिकलीपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तसंत महिला चालक दलासाठीही यादी थोडी मोठी आहे. महिला चालक दलातील सदस्यांनी मोठ्या इयररिंग्स घालू नये, टिकलीही 0.5 सेमीपेक्षा मोठी असू नये, बांगड्याही डिझाईन असलेल्या असू नये, केस बांधण्यासाठी हाय टॉप नॉट असू नये असे काही नियम घालण्यात आलेत. सर्व महिला क्रू मेंबर्सना याचं पालन करावं लागणार आहे.
5 / 7
यासोबतच महिला केबिन क्रूसाठी दागिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत. यामध्ये महिला कर्मचारी हातात जास्त बांगड्या घालू शकत नाहीत. आयशॅडो, लिपस्टिक, नेल पेंट आणि हेअर शेड कार्डचेही काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मोत्याच्या इयररिंग्सना परवानगी नाही. फ्लाइट अटेंडंट फक्त सोन्याचे किंवा डायमंडच्या आकाराचे कानातले विना डिझाइन इयररिंग्स घालू शकतात.
6 / 7
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ज्या पुरुष क्रू मेंबर्सच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी क्लिन शेव्ह लूक ठेवावा. अशा क्रू मेंबर्सनं रोज शेव्हिंग करणं अनिवार्य आहे. तसंच केसांची ठेवणंही योग्य हवी असं सांगण्यात आलंय.
7 / 7
एअर होस्टेससाठी स्कीनच्या रंगाशी मिळतीजुळती शिअर काफ लेंथ स्टॉकिंग्स साडी आणि इंडो वेस्टर्न वेअर आदि दोन्हीसह ड्युटी अनिवार्य आहे. तसंच मेहेंदी लावण्यासही परवानगी नाही. तसंच हातावर गळ्यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक दोरे बांधण्यासही परवानगी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सध्ये हेअर कलर अथवा क्लिन शेव्ह आणि टाय पिन परिधान करणं यांना लागू करण्यात आलेलं नाही.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटा